पुणे विभागात ९५ लाख ५७ हजार टन ऊस गाळप

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः पुणे विभागातील ३४ साखर कारखान्यांपैकी ३० साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदवला आहे. हे कारखाने बऱ्यापैकी क्षमतेने सुरू आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत ९५ लाख ५७ हजार ३७ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १०३ लाख ८६ हजार ९९५ क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.८७ टक्के आहे, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.  

चालू वर्षी असलेली उसाची कमतरता बघता शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांना गाळप सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, उशिराने झालेल्या पावसामुळे गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. अनेक साखर कारखान्यांनी उशिराने गाळप सुरू केले होते. विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २० नोव्हेंबरनंतर धुराडे पेटवत गाळप हंगाम सुरू केला.

पुणे विभागात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास ३४ साखर कारखाने आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात तर सातारा जिल्ह्यातील अनेक भागांत उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे आणि पाणीटंचाईमुळे उसाच्या लागवडीत घट झाली. सध्या तोडणी मजुरांद्वारे वेगात ऊस तोडणी केली जात आहे. त्यासोबत अनेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.     

जिल्हानिहाय झालेले उसाचे गाळप
जिल्हा  सुरू कारखाने  ऊस गाळप (टन) साखर (क्विंटल) उतारा (टक्के)
पुणे १६ ५२,७४,५४८ ५४,४८,६१५   १०.३३
सातारा  १४ ८२,८२,४८९ ४९,३८,३८० ११.५३
एकूण ३०  ९५,५७,०३७  १०३,८६,९९५ १०.८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com