बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलन

ठिय्या आंदोलनात शिवेंद्रसिंहराजे भोसले, सदाभाऊ सपकाळ आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते
ठिय्या आंदोलनात शिवेंद्रसिंहराजे भोसले, सदाभाऊ सपकाळ आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते

मेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, धरणाचे काम तातडीने सुरू केलेच पाहिजे, या मागण्यांसाठी मेढा (ता. जावळी) येथील मुख्य चौकात सोमवारी (ता. १७) ठिय्या आंदोलन करून सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर ‘चक्का जाम’ करण्यात आला.

बोंडारवाडी धरणासाठी बोंडारवाडी धरण कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या चक्काजाम, धरणे आंदोलनात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, धरणग्रस्त कृती समितीचे नियंत्रक विजय मोकाशी, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, एस.एस.पार्टे गुरुजी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अमित कदम, ज्ञानदेव रांजणे,जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, एकनाथ ओंबळे आदी उपस्थित होते.

चक्काजाम आंदोलनावेळी आमदार भोसले म्हणाले, की बोंडारवाडी धरण व्हावे ही माझी प्रामाणिक इच्छा असून यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत धरणासाठी शांततेत आंदोलने झाली आहेत. यापुढे धरणाचे काम सुरू व्हावे अन्यथा वेगळा विचार करून तीव्र आंदोलन छेडले जाईल. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई या गावांना सोसावी लागत असून प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न आहे. हा प्रश्न सर्वांच्या सहकार्याने मिटवणार आहे. 

यावेळी माजी आमदार सपकाळ, विजय मोकाशी यांची भाषणे झाली. दरम्यान दुपारी १२ वाजेपासून सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. पवार व श्री. गायकवाड यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यामध्ये गुरूवारी (ता. २०) पोलिस बंदोबस्तात ट्रायपीट करण्यात येईल. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त दिला जाईल असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com