Farming Agricultural News Marathi agri inputs bills will submit to panchayat samiti pune maharashtra | Agrowon

वस्तू खरेदीची बिले पंचायत समित्यांना सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेचे आदेश

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तत्काळ वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करावीत, वेळेत बिले सादर झाली तर अनुदान मिळेल, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले. 

पुणे  : जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वस्तू खरेदीसाठी दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी तत्काळ वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करावीत, वेळेत बिले सादर झाली तर अनुदान मिळेल, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले. 

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून वैयक्‍तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज मागविले असता, शेतकरी आणि महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाकडून वैयक्तिक लाभ योजनेतून यावर्षी एकूण तेरा अवजारे दिली जाणार आहेत. यामध्ये मोटार पंपसंच, डिझेल इंजिन पंपसंच, पीव्हीसी पाइप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप, स्प्रेपंप ऑइल इंजिनसह प्लॅस्टिक क्रेटस, प्लॅस्टिक ताडपत्री, सरी रिजर ट्रॅक्‍टरचलित, इलेक्‍ट्रॉनिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह या वस्तूंचा समावेश आहे. 

या योजनेतून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करून पंचायत समित्यांना पाठविली आहे. लाभार्थ्यांना वस्तू खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत वस्तू खरेदी करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. याद्या प्रसिद्ध केल्यापासून लाभार्थ्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे २१ दिवसांची मुदत दिली आहे. त्यातील काही विभागाची मुदत संपली असून, ज्यांनी वेळेत वस्तूंची खरेदी केली नाही, त्या ऐवजी आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनाही वेळेत खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वस्तू खरेदी पूर्ण झाल्यानंतर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर अनुदान जमा होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...