कृषी शास्त्रज्ञांनी समर्पित भावनेने काम करावे : कुलगुरू डॉ. अशोक ढवण

परभणी ः आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी समर्पित भावनेने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १) परभणी कृषी विद्यापीठात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता. १) परभणी कृषी विद्यापीठात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

परभणी  ः आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी समर्पित भावनेने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती बुधवारी (ता. १) कृषिदिन म्‍हणून साजरी करण्‍यात आली. या वेळी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुधवार (ता. १) ते मंगळवार (ता. ७) या कालावधीत आयोजित कृषी संजीवनी सप्‍ताहानिमित्ताने जनजागृती अभियानाचे उद्घाटन डॉ. ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

या वेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव रणजित पाटील, जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संतोष आळसे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ. अरविंद सावते, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्या डॉ. जयश्री झेंडे, विद्यापीठ नियंत्रक एन. एस. राठोड, प्रभारी संशोधन संचालक डॉ. गजेंद्र लोंढे आदी उपस्थित होते.

कृषी संजीवनी सप्‍ताहानिमित्त विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ शेतकऱ्यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कृषी विभागाच्‍या समन्‍वयाने विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचे पथक स्‍थापन करण्‍यात आले आहे. या वेळी सूत्रसंचालन प्रा. विजय जाधव यांनी केले. आभार डॉ. रणजित चव्‍हाण यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com