Farming Agricultural News Marathi agriculture helpers gives payment to chief minister fund Akola Maharashtra | Agrowon

‘कोरोना’चा सामना करण्यासाठी ११ हजार कृषी सहायकांनी दिले वेतन

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उदभवलेली परिस्थिती पाहता शासनास सहाय्य म्हणून राज्यातील कृषी सहायकांनी मानवतेच्या दृष्टीने आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. राज्यातील ११ हजार कृषी सहायक एप्रिलच्या वेतनातून एक दिवसाचा पगार शासनाच्या तिजोरीत जमा करणार आहेत. या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी जमा होईल, असा अंदाज आहे. 

अकोला  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उदभवलेली परिस्थिती पाहता शासनास सहाय्य म्हणून राज्यातील कृषी सहायकांनी मानवतेच्या दृष्टीने आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. राज्यातील ११ हजार कृषी सहायक एप्रिलच्या वेतनातून एक दिवसाचा पगार शासनाच्या तिजोरीत जमा करणार आहेत. या माध्यमातून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी जमा होईल, असा अंदाज आहे. 
 

याबाबत संघटनेचे कोषाध्यक्ष अनंत देशमुख म्हणाले की, आज सर्वत्र कोरोनाच्या संकटाविरोधात लढा दिला जात आहे. राज्यातील आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन, कृषी विभागासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी कार्यरत आहेत. राज्यात निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत सामाजिक भान ठेवून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्यभरातील सर्व ११ हजार कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

हा निधी एप्रिलच्या पगारातून कपात केला जावा, अशी विनंती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, कार्याध्यक्ष धनंजय सोनुने,  कोषाध्यक्ष अनंत देशमुख, सरचिटणीस वसंत जारीकोटे व संघटनेच्या सदस्यांनी हा निर्णय घेतला. 
 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...