आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील इसुका दार्सी या गावातील शेतकरी जी.
ताज्या घडामोडी
विंग परिसरात ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव
विंग, जि. सातारा ः परिसरात रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात अळी पोंग्यात असून तिने ठिकठिकाणी पाने कुरतडली आहेत. परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
विंग, जि. सातारा ः परिसरात रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात अळी पोंग्यात असून तिने ठिकठिकाणी पाने कुरतडली आहेत. परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
विंगसह परिसरात अतिवृष्टीने खरीप वाया गेला. त्यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. नुकसान भरपाईही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता रब्बीवर अवलंबून आहे. नोव्हेंबरच्या प्रारंभी पेरणी केलेले ज्वारी पीक परिसरात ठिकठिकाणी गुडघ्यावर आले आहेत. तालुक्यात चार हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशेने शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
सध्या पीकात आंतरमशागती सुरू आहेत. मात्र त्यावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. पहिल्या टप्प्यात असल्याने अळीचा रंग हिरवा असून सहजासहजी ती दिसून येत नाही. सध्या ही अळी पोंग्यात आहे. अनेक ठिकाणी या अळीने पिकाची पाने कुरतडल्याचेही दिसून येत आहेत. प्रादुर्भाव झालेली पीक कोमजले आहे.