आषाढी पालखी सोहळा प्रथा, परंपरेनुसार निघणार ः राणामहाराज वासकर

सोलापूर ः राज्यात ‘कोरोना’चे सावट असले तरी वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरुन सरकारच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी बुधवारी (ता.६) विविध संतांच्या पालखी सोहळा प्रमुखांशी झालेल्या व्हिडिओ कॅान्फरन्समध्ये मांडली आहे.
संग्रहित छायाचित्र

आषाढी पालखी सोहळ्याचे प्रस्थान पुढील महिन्यात आळंदीतून होणार आहे. परंतु ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाने या सोहळ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त, महाराज मंडळींची पंढरपुरातून व्हिडिओ कॅान्फरन्स पार पडली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरुन काढणे शक्य असल्याची भूमिका मांडली.

श्री. वासकर म्हणाले, की आषाढी पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. ही परंपरा यापुढेही कायम सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. ‘कोरोना’चे सावट असले, तरी हा सोहळा मोठ्या थाटात आणि डामडौलात काढण्याचा आमचा विचार आहे. अर्थात, काही मार्ग बदलून प्रमुख सात पालख्या या सोहळ्यात सहभागी होतील आणि सरकारकडून जे नियम आणि अटी घालून दिल्या जातील, त्याप्रमाणे आम्ही पालखी काढू, असे ते म्हणाले. यासंबंधी सरकारशी चर्चेसाठी एक शिष्टमंडळ नेमले जाईल, ते याबाबत चर्चा करतील आणि निर्णय होईल, असेही ते म्हणाले. सरकारने अद्याप याबाबत काहीच भूमिका मांडलेली नाही. 

दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात १२ जूनला देहूहून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आणि १३ जूनला संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com