‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांवर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्ह्यामध्ये नागरिकांची दक्षता बाळगण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही. तसेच यापूर्वी देण्यात आलेली परवानगी साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. शासनाच्या या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com