Farming Agricultural News Marathi Cancellation of non-governmental appointments on Agricultural Marketing Board Mumbai Maharashtra | Agrowon

कृषी पणन मंडळावरील अशासकीय नियुक्त्या रद्द

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

मुंबई : फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी (ता.१९) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 

मुंबई : फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्या आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी (ता.१९) यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील कलमान्वये महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे संबंधित महसूल विभागातून बाजार समित्यांच्या सभापतींमधून फडणवीस सरकारने या नियुक्त्या केल्या होत्या. त्यापैकी अमरावती, नाशिक, पुणे आणि कोकण या विभागातील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या ६ जून २०१७ ला करण्यात आल्या होत्या. 

नागपूर महसूल विभागातील नियुक्त्या १८ जानेवारी २०१८ ला करण्यात आली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर फडणवीस सरकारने शासनाच्या विविध समित्या, मंडळांवर अशा अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या आहेत. 

नियुक्त्या रद्द केलेल्यांमध्ये मोहन उत्तमराव इंगळे (सभापती, धामणगाव बाजार समिती, जि.अमरावती), नारायण बाजीराव पाटील (सभापती, दौंडाईचा बाजार समिती, जि.धुळे), भाऊसाहेब भगवान गायकवाड (सभापती, आटपाडी बाजार समिती, सांगली), रवींद्र नारायण घोडविंदे (सभापती, कल्याण बाजार समिती, जि.ठाणे) आणि रुपचंद रामकृष्णजी कडू (सभापती, उमरेड बाजार समिती, जि. नागपूर) यांचा समावेश आहे.

वस्त्रोद्योग महामंडळावरील नियुक्तीही रद्द
दरम्यान, फडणवीस सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी केलेली तानाजीराव मनोहर शिंदे यांची नियुक्तीही ठाकरे सरकारने रद्द केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...