जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी नगर, श्रीरामपुरला नियंत्रण कक्ष

नगर ः ग्रामीण भागातून शहरी भागात भाजीपाला, दूध व अन्य जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वाहनांना सुरक्षित जाता यावे याकरिता नगर व श्रीरामपुर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. वाहतुक करणाऱ्या वाहनांना तेथून पासेस देण्याची सोय परिवहन विभागाने केली आहे.
संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यातील अनेक गावांत दूध, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यभरात बाजार समित्या चालू असताना नगर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाभरातील बाजार समित्या बंद आहेत. त्याचे गंभीर परिणाम भाजीपाला उत्पादकांवर झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असल्याने पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केलेली आहे.

जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करण्याला परवानगी असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागातील वाहने शहरात येऊ शकत नसल्याने भाजीपाला, दुधाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि वाहने अडवली जाऊ नयेत यासाठी नगर, श्रीरामपुर येथे परिवहन विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. तेथून वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनांना पास देण्याची व्यवस्था केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com