Farming Agricultural News Marathi corona patient status in district sindhudurga maharshtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू; मात्र ‘कोरोना’ शी संबंध नाही : जिल्हाधिकारी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

सिंधुदुर्ग  ः येथील जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या चार जणांचा ४८ तासांत मृत्यू झाला. याशिवाय होम क्वारंटाइन केलेल्या एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या मृत्युचा ‘कोरोना’शी सबंध नाही. मात्र, त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून, त्यातील तीन नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन जणांच्या नमुन्याचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधुदुर्ग  ः येथील जिल्हा रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या चार जणांचा ४८ तासांत मृत्यू झाला. याशिवाय होम क्वारंटाइन केलेल्या एका महिलेचा देखील मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या मृत्युचा ‘कोरोना’शी सबंध नाही. मात्र, त्यांचे नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून, त्यातील तीन नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन जणांच्या नमुन्याचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘कोरोना’चा एक रूग्ण सापडला होता. उपचाराअंती या रूग्णाचे तीनही अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाबाधित रूग्ण नाही. परंतू, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवित आहे. जिल्हा रूग्णालयात आयसोलेशन कक्षातील चौघांचा दोन दिवसांत मृत्यू झाला तर क्वारंटाइन केलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युशी ‘कोरोना’चा सबंध नाही. तरीदेखील त्यांचे नमुने तपासणीकरीता मिरजला पाठविण्यात आले आहेत. त्यातील तिघांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते निगेटिव्ह आले आहेत.

उर्वरित दोघांचा अहवाल यायचा आहे. मृत झालेल्या पाच पैकी तीन व्यक्ती वयस्कर होत्या. त्यांना अन्य आजार होते. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाला तर एक तरूण आणि एक तरूणीला दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यातुन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही ‘कोरोना’ची लक्षणे नव्हती. तरीही खात्रीसाठी नमुने पाठविण्यात आले होते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आयसोलेशन कक्षात आणखी दोन रूग्ण दाखल झाले आहेत. सध्या या कक्षात ६२ रूग्ण दाखल आहेत. नव्याने २० रूग्णांचे नमुने मिरजला तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. आतापर्यत २२८ व्यक्तींचे नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १९७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. होम क्वारंटाइन केलेल्या १९२ व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये नव्याने सात व्यक्तींना दाखल केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...