नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर कापूस लागवड

नगर ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे. अजून साधारण दहा ते बारा हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची अंदाज आहे. 

उसाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भातील कापसाचे पीक घेतले जात आहे. अलीकडच्या दहा वर्षात कापसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच कापसाची लागवड सुरू झाली. यंदा पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पाथर्डी, शेवगाव व नेवासा या तालुक्यांत आत्तापर्यंत सर्वाधिक लागवड झाली आहे. यंदा या तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून अजून दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचा अंदाज आहे. सतत पाऊस होत असल्याने उगवण चांगली झाली आहे. 

श्रीगोंदे कर्जतमध्ये देखील क्षेत्रात वाढ  कापसाचे पीक मराठवाडा, विदर्भात घेतले जाते. मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यात हे पीक आले. आता अलीकडच्या काळात कर्जत, श्रीगोंद्यातही कापसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी तालुक्यात फार नसले तरी दरवर्षी काही प्रमाणात क्षेत्र वाढ होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com