Farming Agricultural News Marathi Cotton cultivation on over one lakh hectares in district Nagar Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर कापूस लागवड

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. 

नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कापूस लागवड झाली आहे. अजून साधारण दहा ते बारा हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची अंदाज आहे. 

उसाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या नगर जिल्ह्यात मराठवाडा, विदर्भातील कापसाचे पीक घेतले जात आहे. अलीकडच्या दहा वर्षात कापसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच कापसाची लागवड सुरू झाली. यंदा पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात कापसाच्या लागवड क्षेत्राने सरासरी ओलांडली आहे. आत्तापर्यंत एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पाथर्डी, शेवगाव व नेवासा या तालुक्यांत आत्तापर्यंत सर्वाधिक लागवड झाली आहे. यंदा या तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून अजून दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचा अंदाज आहे. सतत पाऊस होत असल्याने उगवण चांगली झाली आहे. 

श्रीगोंदे कर्जतमध्ये देखील क्षेत्रात वाढ 
कापसाचे पीक मराठवाडा, विदर्भात घेतले जाते. मराठवाड्याला लागून असलेल्या शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यात हे पीक आले. आता अलीकडच्या काळात कर्जत, श्रीगोंद्यातही कापसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, राहता, राहुरी तालुक्यात फार नसले तरी दरवर्षी काही प्रमाणात क्षेत्र वाढ होत आहे.


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...