मार्चमधील पावसाचा नगर जिल्ह्यातील ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

नगर ः मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा ३३ हजार ४२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यातील २१ हजार ३६९ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. ४५७ गावांतील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या शेतात हे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा ३३ हजार ४२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यातील २१ हजार ३६९ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. ४५७ गावांतील सुमारे ५० शेतकऱ्यांच्या शेतात हे नुकसान झाले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

मार्च महिन्यातील सहा ते सात दिवस जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. यात भाजीपाला, फळांसह काढणीला आलेल्या गहु, कांद्याचे नुकसान झाले. या पावसाचा साधारण आठ तालुक्यांतील शेतीला फटका बसला. श्रीगोंदा तालुक्यात १८५, श्रीरामपूर तालुक्यात १० हजार ८५२, पारनेर तालुक्यात १, कोपरगाव तालुक्यात एक हजार सतरा अशा १२ हजार ०५६ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यात गहु, कांदा, हरभरा, द्राक्षांना फटका बसला आहे. सहा तालुक्यांतील २१ हजार ३६९ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान असे

  • नुकसानग्रस्त गावेः ३६१
  • शेतकरी ः ३० हजार ५९१
  • नुकसान झालेले क्षेत्र ः २१३५९
  •   पीकनिहाय नुकसान असे (हेक्टर) ः गहू ः ७२९१, बाजरी ः ३५, मका ः ७८७, हरभरा ः ११८६, कांदा ः ५०८९, भाजीपाला ः १४२९, आंबा ः ६८, संत्रा ः १४३६, पेरु ः ११, मोसंबी ः १२, सिताफळ ः १५, चिकू ः १२, डाळिंब ः ३८३२, द्राक्ष ः ३२४.   तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टर) ः पाथर्डी ः ८६६८, राहुरी ः ८३३१, नेवासा ः ७९६, शेवगाव ः ६०, कोपरगाव ः १३९, राहाता ः ३३७४.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com