इंदापूर, बारामती, भोर, मावळात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे ः जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, भोर, मावळ तालुक्यात रविवारी (ता.१९) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने गहू, ऊस, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे, आंबा, चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मेटाकुटीला आलेले शेतकरी या पावसामुळे आणखीनच अडचणीत आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, भोर, मावळ तालुक्यात रविवारी (ता.१९) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने गहू, ऊस, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे, आंबा, चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मेटाकुटीला आलेले शेतकरी या पावसामुळे आणखीनच अडचणीत आले आहेत.

इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर, निमसाखर, काटी, सराफवाडी, वरकुटे, निमगाव केतकी, भोडणी, पंधारवाडी, बावडा, भवानीनगर, कापूरहोळ, किकवी, सारोळा, कासुरडी परिसरात अचानक पाऊस झाला. त्यातच ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने काढणीला आलेली पिके, फळे शेतातच उभे आहेत. त्यातच शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जोरदार वारे, गारांसह झालेल्या पावसामुळे शेतात उरली सुरलेली फळांची झाडे तसेच मका, कडवळ, गहू, मका, केळी, बाजरी, कारले आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. बारामती तालुक्यात सोमेश्वरनगर, चौधरवाडी, देऊळवाडी, करंजे, निंबूत, करंजेपूल, होळ, वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम येथे रविवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अचानक पाऊस झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली.

भोर तालुक्यात विसगाव खोऱ्यातील खानापूर, हातनोशी, गोकवडी, बाजारवाडी, वरवडीले, बालवडी, आंबाडे या गावांच्या परिसरात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह सुमारे एक तास पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. हिर्डोशी खोऱ्यात वीज पडल्याने एक घर जळाले तर वादळी वाऱ्यामुळे कोसळलेल्या विजेच्या तारांचा धक्का बसल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर भोरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, बागायतीमधील घेवडा, भुईमूग, पालेभाज्यांचे नुकसान झाले. काही ठिकाणी वादळी वारा असल्यामुळे मोठमोठी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. दौंड तालुक्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे कलिंगड, खरबूज, द्राक्षे, आंबे, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. वडगाव मावळमध्ये तुरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com