विदर्भात पावसामुळे पिकांना फटका

धामणगाव रेल्वे बाजारसमितीतील शेतीमाल पावसामुळे भिजला
धामणगाव रेल्वे बाजारसमितीतील शेतीमाल पावसामुळे भिजला

नागपूर  ः विदर्भात सर्वदूर पुन्हा अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे दाणादाण उडाली. बुधवारी (ता. ८) पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तर पश्‍चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात धान केंद्रांवर शेतकऱ्यांची शेतीमालाची पोती भिजल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. गारपिटीमुळे नेरपिंगळाई भागात गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

विदर्भात गेल्या महिनाभरापासून थंडीची तीव्रता वाढत आहे. गहू, हरभरा पिकांकरिता ही थंडी पोषक ठरत आहे. परंतु त्यासोबतच ढगाळ वातावरणदेखील कायम असल्याने पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञ वर्तवत आहेत. गेल्या आठवड्यात पाऊस, गारपिटीने नागपूरसह वरुड, मोर्शी भागात नुकसान झाले होते. त्यानंतर बुधवारी (ता. ८) पुन्हा अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसाचा पहा video

भंडारा जिल्ह्यात धानाची हमीभावासह ७०० रुपये जादा देऊन खरेदी केली जात आहे, त्यामुळे धानाचे दर २५०० रुपयांवर पोचल्याने शेतकरी धान केंद्रांवर आपला शेतीमाल विक्रीसाठी गर्दी करीत आहेत. हा शेतमाल बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अमरावती, नागपूर जिल्ह्यातील संत्रा पीक ताणावर आहे.

बुधवारी झालेल्या पावसामुळे ताण तुटल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. नेरपिंगळाई परिसरात गारपीट झाल्याने गहू, हरभरा पिकाला फटका बसला. काढणीस आलेल्या तुरीचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातही धान केंद्रावर पावसामुळे दाणादाण उडाली. नागपूर जिल्ह्यात तूर, कपाशीला फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसाचा परिणाम

  •  अमरावती, नागपूर जिल्ह्यांत संत्र्याचा ताण तुटला
  • गहू, हरभरा पिकांचे नुकसान
  •  तूर, कपाशीला फटका
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com