Farming Agricultural News Marathi demand for to clear loan waive sangli maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त करा : शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सांगली  ः गेली काही वर्षे दुष्काळ आणि त्यानंतर महापुराने शेतकरी अडचणीत आहेत. शेतीमालाला योग्य हमीभावाअभावी कर्जाचा बोजा वाढतोच आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली.

केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. 

सांगली  ः गेली काही वर्षे दुष्काळ आणि त्यानंतर महापुराने शेतकरी अडचणीत आहेत. शेतीमालाला योग्य हमीभावाअभावी कर्जाचा बोजा वाढतोच आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली.

केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. 

सांगलीतील कल्पतरू मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. १२) शेतकरी नेते शरद जोशी व हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते. 

या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, की राज्यातील कोणत्याही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू घेण्याच्या मनःस्थितीत नाही. गतवर्षी देशात तीन लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच उसाला ४७०० रुपये दर दिला. उत्तर प्रदेशात यंदाची एसएपी ३२५० रुपये आहे. हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायला हवी. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असतानाही शक्‍य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू. 

या वेळी पुणे विचारवेधचे आनंद करंदीकर, शिवाजीराव नांदखिले यांचे भाषण झाले. जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, डी. जी. माळी, रावसाहेब ऐतवडे, वंदना माळी यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, शेतकरी या वेळी उपस्थित होते. 

शेतकरी परिषदेतील प्रमुख ठराव... 

  • सरसकट कर्ज, वीजबिल माफी करावी. 
  • शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत. 
  •  शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी. 
  • उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा. 
  • गायीच्या दुधाला ४०, तर म्हैशीच्या दुधाला ६० रुपये दर मिळावा.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात सव्वासात लाख टन उसाचे गाळपजळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार या...
मुंबई बाजार समिती निवडणुकीकरिता अर्ज...पुणे  ः देशातील सर्वांत मोठ्या समजल्या...
पुणे विभागासाठी १९९० कोटींच्या...पुणे  ः  पुणे विभागाच्या २०२०-२१ च्या...
केळीवरील सोंडकिडीचे कामगंध...जागतिक पातळीवर केळीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या...
साताऱ्यातील शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण...सातारा  ः जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेंतर्गत...
परमीट बंद; नगर जिल्ह्यात फळबाग लागवडीवर...नगरः राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून फळबाग...
जळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...