Farming Agricultural News Marathi demand to establish committee for Safely agri inputs distribution Amaravati Maharashtra | Agrowon

कृषी निविष्ठांच्या सुरक्षित वितरणासाठी समन्वय समिती स्थापन करा ः आमदार सुलभा खोडके

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

अमरावती  ः खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर निविष्ठा खरेदीसाठी गर्दी होईल. ही बाब लक्षात घेत ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित निविष्ठा वितरणासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करावी, अशी सुचना आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे.

अमरावती  ः खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी सेवा केंद्रांवर निविष्ठा खरेदीसाठी गर्दी होईल. ही बाब लक्षात घेत ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित निविष्ठा वितरणासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करावी, अशी सुचना आमदार सुलभा खोडके यांनी केली आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या तयारीला लागले आहेत. जिल्ह्यात जवळपास ७ लाख २८ हजार ११२ हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मका आदी पिके जिल्ह्यात घेतली जातात. हंगामाकरिता ८६,२३५ क्‍विंटल बियाणे महाबीजकडून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची मागणी १ लाख ३० हजार क्‍विंटल आहे. संकरीत कापसाच्या ५,८५०, तुरीच्या ५,२८० क्‍विंटल बियाण्यांची मागणी आहे. १ लाख ३८ हजार टन खतांची मागणी आहे. त्यातील १,०१,८३० टन खत पुरवठ्याला मंजूरी मिळाली आहे. रब्बीमधील १६,८२४ टन खतसाठा शिल्लक आहे. एकंदरीत कृषी निविष्ठांची मुबलकता असल्याची स्थिती आहे.

सध्या कृषी सेवा केंद्रांवरुन बियाणे तसेच इतर निविष्ठांची उचल अत्यल्प आहे. खरीप जवळ येताच शेतकरी निविष्ठा खरेदीकरिता एकाचवेळी गर्दी करतील. परिणामी कोरोना नियंत्रणासाठीच्या प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता आहे. त्यासोबतच पीककर्ज विषयक तक्रारींमध्ये देखील वाढ होणार आहे. हे लक्षात घेता या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनने जिल्हास्तरावर समन्वय समितीचे गठण करावे, अशी सुचना आमदार खोडके यांनी केल्या आहे. 
 

जिल्हास्तरीय समन्वय समिती 
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, कृषी विकास अधिकारी यांचा समावेश करावा. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त एका तहसीलदारांची नेमणूक करुन तालुका व जिल्हास्तरीय समन्वय समितीमध्ये ताळमेळ बसवावा, अशीही आमदार खोडके यांची मागणी आहे.  


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...