महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची मुदत ३० जूनपर्यंत वाढवा ः विखे पाटील

नगर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवावी, अशी मागणी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार राधाकृष्ण विखे पाटील

नगर  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती पाहता शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढवावी, अशी मागणी माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत आमदार विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र देत या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींकडे लक्ष वेधले. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची मुदत ही ३० मार्च २०२० पर्यंत होती. या योजनेत सहभाग घेता यावा म्हणून शेतकऱ्यांनी पूर्तता सुरू केली. परंतू ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मोठा अडथळा शेतकऱ्यांसमोर आहे. त्यातच उत्पादित केलेला शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणणे त्यांना शक्य होत नाही. बुधवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अधिकच अर्थिक विवंचनेत सापडले असून कर्जखात्यात भरावयाची रक्कम जमवणे अवघड असल्याकडे विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत सहभागासाठी आवश्यक पूर्तता शेतकऱ्यांना करता यावी तसेच एकरकमी कर्जफेड योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आणि ज्या शेतकऱ्यांना फक्त व्याज भरून आपल्या कर्जाचे पुनर्गठण करायचे आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या पैशांची तरतूद झाली नाही तर शेतकऱ्यांची कर्जखाती थकबाकीत दिसतील, परिणामी शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील ही बाब विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com