Farming Agricultural News Marathi demand to give insurance cover for animal husbandry department workers Nagar Maharashtra | Agrowon

पशुसंवर्धन अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही विमा संरक्षण देण्याची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

नगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. सगळीकडे लॉकडाउन असताना ग्रामीण व शहरी भागात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. परंतु सुविधा व विमा संरक्षणापासून ते वंचित आहेत तरी याबाबी लागू कराव्यात, अशी मागणी नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केली आहे.

नगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. सगळीकडे लॉकडाउन असताना ग्रामीण व शहरी भागात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाळीव जनावरांवर उपचार करीत आहेत. परंतु सुविधा व विमा संरक्षणापासून ते वंचित आहेत तरी याबाबी लागू कराव्यात, अशी मागणी नगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक हे आजारी पशुधनाचा जीव वाचविण्यासाठी पशुपालकांच्या दारात जाऊन सेवा उपलब्ध करून देत आहेत. तसेच पशुपालकांना स्वतःची व पशुची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. हे सर्व करत असताना पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अनेक व्यक्तींच्या संपर्कात येत आहेत ही बाब निवेदनात निदर्शनास आणून दिली असून या कर्मचाऱ्यांना पुढील ९० दिवसासांठी किमान एक कोटींचे विमा संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पशुंवरील उपचाराचे सेवाशुल्क नको
लॉकडाउन असल्याने शेतमाल मातीमोल भावाने विकला जात असून दुधाचे दर कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांना पशुंवरील उपचाराचे सेवाशुल्क व कृत्रिम रेतनाचे सेवाशुल्क देणे अवघड झालेले आहे. पशुपालकांकडुन कोणतेच सेवाशुल्क आकारण्यात येऊ नये,अशीही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.


इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...