शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करा ः विजय जावंधिया

नागपूर ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी जाहिर करण्यात आलेले पॅकेज कुचकामी आहे. त्याऐवजी शासनाने हमीभावाने शेतीमालाची खरेदी व रोजगार हमी योजनेतून शेतीकामे यांसारख्या उपायांवर भर दिल्यास शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक कोंडी दूर करावी, अशी मागणी शेतीप्रश्‍नांचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.
विजय जावंधिया
विजय जावंधिया

 नागपूर  ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी जाहिर करण्यात आलेले पॅकेज कुचकामी आहे. त्याऐवजी शासनाने हमीभावाने शेतीमालाची खरेदी व रोजगार हमी योजनेतून शेतीकामे यांसारख्या उपायांवर भर दिल्यास शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक कोंडी दूर करावी, अशी मागणी शेतीप्रश्‍नांचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे.

लॉकडाऊन दरम्यान सामान्यांचे हित जपण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांचे पॅकेज जाहिर करण्यात आले आहे. जाहिर करण्यात आलेल्या पॅकेजमध्ये ग्रामीण जनता व शेतकऱ्यांसाठी नवे काहीच नाही. शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. ‘पीएमकिसान’ मधून पूर्वीपासून ते तीन टप्प्यांत दिले जात आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मोबदल्यात २० रुपयांची वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. यापुर्वी १८२ रुपये रोज होता आता तो २०२ रुपये झाला आहे. त्या माध्यमातून या योजनेवर काम करणाऱ्यांना २००० रुपयांचा फायदा होईल असा दावा करण्यात आला. त्याकरिता १०० दिवसांचे काम मिळायला हवे. यापूर्वी देशात अवघ्या ४८ दिवसांचे काम देण्यात येत होते. त्यामुळे १०० दिवस रोजगार कसा आणि कोठे उपलब्ध होईल, याबाबतही स्पष्टता नाही.

दुसरीकडे सवलतीच्या दरात धान्य देण्याची घोषणा केली आहे. परंतू मजूरीच नाही तर पाच किलो धान्य सवलतीच्या दरात कसे खरेदी करणार? याचाही विचार धोरण ठरविताना केला गेला नाही. कापूस, सोयाबीन, तूर सोबतच रब्बीतील हरभरा, गहू या पिकांची काढणी झाली आहे. बाजारात शेतीमालाची मनमानी दराने खरेदी होत आहे. शेतीमालाच्या हमीभावावर कोणीच बोलण्यास तयार नाही. त्यावर उपाय म्हणून बाजार समितीच्या यार्डातच आधारभूत दराने शेतीमालाची खरेदी होईल याची हमी सरकारने दिली पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ती लक्षात घेता रोजगार हमी योजनेतून शेतीकामे झाली पाहिजे. त्यामुळे भांडवल कमी लागेल. नैसर्गिक आपत्ती, बाजार अव्यवस्थेचा शेतकरी सामना करु शकतील, अशा प्रकारच्या उपाययोजनांवर भर देण्याची मागणी श्री. जावंधिया यांनी ‘पीएमओ’कडे केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com