Farming Agricultural News Marathi demand to procure all cotton from farmers nagpur Maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट खरेदी करा : विजय जावंधिया

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

नागपूर  ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून शेतकऱ्यांकडील कापसाची सरसकट खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. असे न झाल्यास कापूस उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागून तब्बल एक हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नागपूर  ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) माध्यमातून शेतकऱ्यांकडील कापसाची सरसकट खरेदी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. असे न झाल्यास कापूस उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागून तब्बल एक हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

श्री. जावंधिया यांच्या पत्रानुसार, कोरोनाच्या आधी व्यापाऱ्यांकडून कापसाला पाच हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा भाव दिला जात होता. सीसीआयकडून त्याचवेळी ५५५० रुपये या हमीभावाने कापसाची खरेदी होत होती. सीसीआय व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने महाराष्ट्रात ४५ टक्‍के कापसाची खरेदी केली. लॉकडाउनमुळे पोल्ट्री उद्योगावर परिणाम झाला. त्यासोबतच सरकीच्या व्यापारात मंदी आली. त्यातच व्यापाऱ्यांनी देखील कापसाची खरेदी बंद केली. २३ मार्चला लॉकडाउन जाहिर झाल्यापासून सीसीआयने देखील कापूस खरेदी थांबविली. २० एप्रिलनंतर कापसाची खरेदी मंदगतीने सुरु आहे. खरेदीचा हाच वेग कायम राहिल्यास पावसाळ्यापर्यंतही खरेदी होणे शक्‍य नाही.

लॉकडाउन पाहता व्यापाऱ्यांकडून देखील ४५०० रुपयांपेक्षा अधिकचा दर मिळणार नाही. यातून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा प्रतिक्‍विंटल एक हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. हमीभावाने केवळ एफएक्‍यू दर्जाचाच कापूस खरेदी करण्यात येईल अशी अट टाकण्यात आली आहे. ही अट काढून टाकत शेतकऱ्यांकडील सरसकट कापसाची खरेदी होण्याची गरज आहे. ‘कोरोना’मुळे अमेरिकेत रुई तर भारतात सरकीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सरकीचे दर भारतात १५०० रुपये क्‍विंटलपर्यंत कमी झाले आहेत. एक क्‍विंटल कापसापासून ३४ किलो रुई व ६४ किलो सरकी मिळते. याचा ताळेबंद मांडल्यास प्रक्रियेअंती ४६२२ रुपये व्यापाऱ्यांना मिळणार आहेत. त्यामुळे कोणताही व्यापारी ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलपेक्षा अधिक दराने कापसाची खरेदीच करु शकणार नाही. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी देखील महाराष्ट्र सरकारकडून सरसकट कापसाची खरेदी व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे आम्ही समर्थन करतो. त्याचवेळी केंद्र सरकारने सीसीआयला आदेश देत सरसकट कापूस खरेदी करावी, अशी मागणीही जावंधिया यांनी केली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...