Farming Agricultural News Marathi Devendra Fadenvis Write a letter to chief minister Mumbai Maharashtra | Agrowon

रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्या ः देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 एप्रिल 2020

मुंबई : रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्यावे, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी महत्त्वाची साधनसामुग्री तत्काळ उपलब्ध करावी आणि तबलिगींसंदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करावी, अशा तीन मागण्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केल्या आहेत. 

मुंबई : रेशनकार्ड उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांनाही धान्य द्यावे, ‘कोरोना’ विरोधात प्रत्यक्ष लढणाऱ्या डॉक्टर आणि नर्ससाठी महत्त्वाची साधनसामुग्री तत्काळ उपलब्ध करावी आणि तबलिगींसंदर्भात कोणताही धार्मिक अभिनिवेश न बाळगता कारवाई करावी, अशा तीन मागण्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केल्या आहेत. 

राज्यातील नागरिकांना रेशनचे धान्य प्राप्त होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत आहेत. केंद्र सरकारने तीन महिन्यांचे धान्य रेशनमार्फत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यापैकी ९० टक्के कोटा राज्याला प्राप्त झाला असताना वितरणाची व्यवस्था खोळंबली आहे. १६ राज्यांनी रेशनकार्ड नसतानाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांचे धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे. शिधापत्रिका नसल्यास आधार कार्ड प्रमाण मानावे, तेही नसल्यास यादी तयार करून प्रमाणित करावी, अशी मागणी श्री. फडणवीस यांनी केली आहे.
मुंबईतील रुग्णालयातील स्थिती आणि प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची कमतरता असल्याचे समोर येत आहेत. त्यांनाही ‘कोरोना’ चा संसर्ग होत असल्याने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता श्री. फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...