Farming Agricultural News Marathi Direct training to farmers of soybean germination capacity test Satara Maharashtra | Agrowon

साताऱ्यात सोयाबीन उगवण क्षमता चाचणीचे शेतकऱ्यांना थेट प्रशिक्षण 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

सातारा   : सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

सातारा   : सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

सासपडे (जि. सातारा) येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी श्री. सोनावले म्हणाले, की येत्या खरीप हंगामात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रात शेतक-यांची बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करणे आणि उत्पादन खर्चात बचत करणे या दुहेरी उद्देशाने  तालुका कृषी आधिकारी अजित पिसाळ,  कृषी उपसंचालक विजय राऊत आणि जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी महेश झेंडे यांचे मार्गदर्शनातून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रत्येक गावात आयोजित केली आहे. 

अशा प्रकारची सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके बोरगाव, नांदगाव, निनाम, वेणेगाव या गावात मंडल कृषी आधिकारी युवराज काटे,  कृषी पर्यवेक्षक रोहिदास तिटकारे, कृषी सहायक विजया जाधव, एम. डी. ठुबे, देवराज पवार यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती यावेळी श्री. सोनावले यांनी दिली.
 
सोयाबीन उगवण क्षमता चाचणी घेताना हे करावे...

  • आपल्या घरी उपलब्ध असलेले सर्व सोयाबीन  स्वच्छ निवडून पोत्यात भरुन ठेवावे. 
  • त्या प्रत्येक पोत्यातून मुठभर सोयाबीन एकत्र करून घ्यावे व त्यातील १०० दाणे मोजून घ्यावेत. हे दाणे स्वच्छ धुतलेल्या गोणपाटाच्या अर्ध्या भागावर दहाच्या संख्येने दहा ओळी करून पसरावे. प्रत्येक दाणा व ओळीमध्ये एक इंच अंतर ठेवावे. 
  • नंतर गोणपाटावर हलकेसे पाणी शिंपडून ओले करावे. 
  • उरलेल्या अर्ध्या गोणपाटाचा भाग बियाण्यावर झाकून ठेवावा किंवा अर्धा भाग कापून बियाणे असलेल्या अर्ध्या भागाची गुंडाळी करून  स्वच्छ, थंड कोरड्या जागेत पाच ते सहा दिवस ठेवावी. 
  • गोणपाट किंचीत ओलसर राहिल एवढेच पाणी आवश्यक असेल तेव्हा शिंपडावे. 
  • ५ ते ६  दिवसांनतंर गोणपाट उघडून निरीक्षण करावे. 
  • शंभर दाण्यापैकी जर ७० ते ८० पेक्षा जास्त दाणे अंकुरीत झाले असतील तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे समजावे. असे बियाणे पेरणीसाठी एकरी ३० किलो वापरावे. 
  • जर ६० ते ७० दाणे अंकुरीत झाले असतील तर पेरणीसाठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे. 
  • जर ६० पेक्षा कमी दाणे अंकुरीत झाले असतील तर असें बियाणे पेरणीसाठी वापरू नये. 
  • अशा दोन ते तीन चाचण्या घ्याव्यात, मगच पेरणी करावी.

इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...