Farming Agricultural News Marathi direct vegetables sell center starts Solapur Maharashtra | Agrowon

सोलापुरात तीन ठिकाणी थेट शेतीमाल विक्री केंद्रे

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

भाजीपाला विक्रीसाठी सध्या शहरातील तीन ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यासाठी १४ शेतकरी कंपन्या पुढे आल्या आहेत. या तीन जागांशिवायही अन्य ठिकाणी काही शेतकरी विक्री करत आहेत. तसेच अन्य ठिकाणीही आम्ही शेतीमाल विक्रीसाठी परवानगी देण्याचा विचार करीत आहोत. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.

सोलापूर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीतील व्यवहार काहीसे विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहेच, पण ग्राहकांवरही भटकंतीची वेळ आली झाली आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागाने मार्ग काढला असून, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील तीन ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था करून दिली आहे. जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत या तीन ठिकाणी भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे.

लॅाकडाउनमध्ये गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नियमावलीमुळे सोलापूर बाजार समितीतील लिलाव बंद आहेत. जेमतेम भागात आणि काही मोजक्याच प्रमाणात भाजीपाल्याचे लिलाव होतात. पण शहराची मागणी आणि शेतकऱ्यांकडून होणाऱ्या शेतीमालाच्या आवकेचा विचार करता याचा मेळ बसत नसल्याने अडचण झाली होती. त्यावर कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकरी गट आणि शेतकरी कंपन्यांना आवाहन केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मिळवून अंत्रोळीकरनगर, कर्णिक नगर आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाशेजारील जागेत आठवड्यातून एकदा हा बाजार भरवला जाणार आहे. प्रामुख्याने या सर्व ठिकाणी विक्रीसाठी शेतकरी गट, शेतकरी कंपन्या आणि शेतकऱ्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...