farming agricultural news marathi disease on wheat crop nagar maharashtra | Agrowon

प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू पिकावर परिणाम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत असल्याने गहू पीक पिवळे पडत आहे. यामुळे वाढ कमी होऊन उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असले तरी गव्हावर नवे संकट आले आहे.
- पंडित कोपनर, शेतकरी. 

नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून प्रतिकूल हवामान असल्याने गव्हाचे पीक पिवळे पडू लागले आहे. पाने तांबडी, पिवळी पडू लागल्याने गव्हावर तांबेराचा प्रादुर्भाव होतो की काय अशी चिंता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत साधारण सरासरीच्या चाळीस टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस झाल्याने मुळात गव्हाच्या पेरणीला उशिरा होऊ लागला. त्यातनंतर थंडी गायब झाल्याने गहू पेरणीला फारसा वेग येताना दिसत नव्हता. आता पुन्हा दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, ढगाळ वातावरण व थंडी गायब झाल्याने गव्हाची पाने पिवळी पडू लागली आहेत.  

कर्जत तालुक्याच्या पूर्व भागातील निंबे, अहल्यानगर, डोंबाळवाडी, शेगूड, अळसुंदे, सटवायवाडी आदी भागांत गहू लहरी हवामानामुळे पिवळा पडू लागला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी आदी पिकांची काढणी करून गव्हाची पेरणी केली होती. मात्र सकाळी थंडी, दुपारी उष्णता, तर मध्येच ढगाळ वातावरण यामुळे गव्हाचे पीक पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे किमान हे पीक पूर्णपणे हातात यावे, यासाठी परिसरातील शेतकरी रासायनिक उपाययोजना करताना दिसत आहेत.  
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...