दोडामार्ग : साडेतीन हजार केळी झाडांचे हत्तींकडून नुकसान

हत्तींनी केळी पिकाचे केलेले नुकसान
हत्तींनी केळी पिकाचे केलेले नुकसान

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यातील वीजघर, बांबर्डे (ता. दोडामार्ग) परिसरातील साडेतीन हजार केळी झाडांचे हत्तींनी एका रात्रीत नुकसान केले. दोडामार्ग तालुक्यात हत्तींचे पुन्हा आगमन झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निर्धास्त असलेल्या शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. 

जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींचा वावर होता; परंतु गेले दीड ते दोन महिन्यांत हत्तींनी स्थलांतर केले होते. त्यामुळे हत्तींच्या उपद्रवामुळे मेटाकुटीस आलेले दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी निर्धास्त झाले होते. तालुक्यात पुन्हा हत्तींचे आगमन झाले आहे. वीजघर, बांबर्डे परिसरातील सिद्धेश राणे, संदेश राणे, भीमराव राणे या तीन शेतकऱ्यांची सुमारे साडेतीन हजार केळींची झाडे हत्तींनी उद्ध्वस्त केली आहेत. एका रात्रीत केळी बाग होत्याची नव्हती झाली. सकाळी शेतकरी बागेत गेल्यावर संपूर्ण केळी कोसळलेल्या स्थितीत दिसून आल्या. या शेतकऱ्यांचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात हत्ती पुन्हा परतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यापूर्वी अनेकदा हत्तींनी शेतकऱ्यांचा पाठलाग करून दुखापत केल्याने गेले दीड ते दोन महिने शेतात बिनधास्तपणे वावरत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आता भीती निर्माण झाली आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे हत्ती पुन्हा तिलारी परिसरात परतले असावेत अशी शक्यता आहे. या दिवसांत हत्ती केळीच्या आतील गाभा खाण्यावर अधिक भर देतात. परतलेले हत्ती यापुढे केळीबागांचे अधिक नुकसान करतील, असा शेतकऱ्यांचा अदांज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com