Farming Agricultural News Marathi Experiment of apple cultivation Nashik Maharashtra | Page 2 ||| Agrowon

सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या शेतकऱ्याचा लागवडीचा प्रयोग

मुकुंद पिंगळे
गुरुवार, 9 जुलै 2020

पारंपरिक शेती न करता फळबाग लागवडीचे प्रयोग करण्याची एक आवड आहे. सध्या सफरचंद लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यास फळधारणा झाली हीच आमच्यासाठी उत्साहवर्धक बाब म्हणायला हवी.  - बाळासाहेब देवरे, शेतकरी, वाजगाव, जि. नाशिक

नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर आहे. आता देवळा तालुक्यातील वाजगाव येथील केवळ कडू देवरे या शेतकऱ्याने मागील वर्षी अर्धा एकर क्षेत्रावर ‘हरमन-९९’ या सफरचंद जातीची लागवड केली. चालू वर्षी काही झाडांना काही प्रमाणात फळधारणा झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

देवरे कुटुंबीयांची एकूण ७० एकर शेती असून सहा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. विविध फळ पिकांची लागवड करून यशस्वी उत्पादन घेण्याचा त्यांचा ध्यास असतो. यापूर्वी त्यांनी ३५ एकर क्षेत्रावर आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, डाळिंब व द्राक्ष फळपिके घेतली आहेत. यानंतर त्यांनी सफरचंद पिकाच्या लागवडीचा प्रयोग केला आहे. जून २०१९ मध्ये जम्मू येथील हरमन ९९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जातीची रोपे त्यांनी मध्यस्थांकडून आणली. त्यांची १० बाय १० फूट अंतरावर लागवड केली. मध्यंतरीच्या काळात काही झाडे वाळली. सध्या बागेत सुमारे दोनशे झाडे आहेत.

लागवडीसाठी ही कलम रोपे जम्मू भागातून विमानाद्वारे नाशिकला आणण्यात आली होती. त्यानंतर लागवडीसाठी शेणखत, निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यांचा वापर करून खड्डा भरण्यात आला होता. पीक संरक्षणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करण्यात आला आहे. लागवडीपश्चात दोन वर्षांनंतर फळधारणा अपेक्षित असल्याचे देवरे यांना सांगण्यात आले होते. मात्र, एक वर्षानंतर तुरळक झाडांना एक, दोन ते तीन या प्रमाणात फळधारणा दिसून आली आहे. मात्र आगामी वर्षात चांगली उत्पादकता शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
लागवडीचे टप्पे 

  • एप्रिल २०१९ : कलम रोपांसाठी श्रीनगर (काश्मीर) येथे फलोत्पादन रोपवाटिकेत नोंदणी 
  • जून २०१९ : रोपांची उपलब्धता झाल्यानंतर लागवड
  • जुलै २०२० : काही प्रमाणात फळधारणा 

काही प्रमुख निष्कर्ष 

  • मे २०२० अखेर कडक ऊन असताना पाने व शेंडे काही प्रमाणात पिवळी पडली. यामध्ये फेरसटी कमतरता दिसून आली. मात्र त्यानंतर फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेट देऊन पिवळी पाने कमी करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिल्यानंतर प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला. 
  • रोग व किडीचा अद्याप प्रादुर्भाव नाही.
  • नत्र उपलब्धता व सुपीकतेसाठी हिरवळीचे खत म्हणून तागाची पेरणी केली आहे. त्यातून गरजेनुसार नत्राची उपलब्धता झाली आहे. 
  • सुरुवातीला आलेल्या फळांचा रंग गडद गुलाबी व हलकासा पिवळा. 
  • मध्यम आकाराचे व अजून पूर्ण पक्व न झालेले फळ चवीसाठी तोडले असता ते रवेदार व मध्यम गोड.
  • हा प्रयोग असल्याने काही निष्कर्ष तपासणी सुरू आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
बुलडाणा जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी मका...बुलडाणा ः जिल्ह्यातील १८ हजार ६८० शेतकऱ्यांनी मका...
दूध दरप्रश्‍नी राज्याचे केंद्र सरकारला...मुंबई: राज्यातील दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
नव्या शिक्षणाची मांडणी शरद जोशींच्या...शरद जोशी जे म्हणतात ते महत्वाचे आहे की...
रेशीम शेतीला संजीवनीकोरोना लॉकडाउनचा फटका दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन...
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...