Farming Agricultural News Marathi Farmers appeal to chief minister to lift onion export ban Nashik Maharashtra | Agrowon

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना साकडे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्यातच कांदादरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्यातच कांदादरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवार (ता. १६) द्वारका येथे भेट घेऊन कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत काही वेळ चर्चा केली. कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून राज्य सरकारने यशस्वी मध्यस्थी करून तात्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. 

निवेदनात म्हटले आहे, की बांगलादेश व ब्रह्मदेशात कांद्याला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मात्र त्यातुलनेत राज्यातील कांद्याला १५ ते २० रुपये प्रतिकिलो दरम्यान दर मिळत आहे. त्यामुळे निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे अजून नुकसान होऊ नये, यासाठी त्वरित निर्यातबंदी हटविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली. 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
'साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
`पागंरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशातील सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...