Farming Agricultural News Marathi farmers company take a initiative for direct vegetable sell Nagpur Maharashtra | Agrowon

थेट भाजीपाला विक्रीसाठी कन्हान शेतकरी कंपनीचा पुढाकार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

नागपूर  ः अडचणी देखील कधीकधी व्यावसायिक संधी निर्माण करतात हा विश्‍वास रुजविण्यात कन्हान ॲग्रोव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी यशस्वी ठरली आहे. कंपनीने लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करीत कंपनीच्या सभासदांसाठी थेट भाजीपाला विक्रीचा पर्याय उपलब्ध करुन देत त्यांची आर्थिक घडी सावरण्यासाठी पुढाकार घेतला.

नागपूर  ः अडचणी देखील कधीकधी व्यावसायिक संधी निर्माण करतात हा विश्‍वास रुजविण्यात कन्हान ॲग्रोव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी यशस्वी ठरली आहे. कंपनीने लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करीत कंपनीच्या सभासदांसाठी थेट भाजीपाला विक्रीचा पर्याय उपलब्ध करुन देत त्यांची आर्थिक घडी सावरण्यासाठी पुढाकार घेतला.

कन्हान येथील नोंदणी असलेल्या कन्हान ॲग्रोव्हिजन शेतकरी उत्पादक कंपनीचे १५० सभासद आहेत. राईस मिल त्यासोबतच शेतीमाल क्‍लिनिंग, ग्रेडींग प्रकल्प उभारणीचे काम कंपनीने हाती घेतले आहे. परंतू सध्या लॉकडाउनमुळे हे काम थांबले. परंतू कंपनीचे व्यवहार थांबू नये तसेच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडावेत याकरिता कंपनीचे अध्यक्ष कमलेश भोयर यांनी थेट भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, मिलिंद राठोड यांच्या माध्यमातून नागपूरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ झोनमध्ये भाजीपाला विक्रीची परवानगी त्यांनी मिळविली.

सालवा, ऐसंबा, निलज या गावातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन त्याची विक्री सुरु केली. आता भाजीपाला विक्रीनंतर दुसऱ्या दिवशी भाजीपाला उत्पादकांना त्यांचे पैसे दिले जातात. वांगी, टोमॅटो, भेंडी, पालक, मेथी, चवळी, मिरचीची विक्री या कंपनीच्या माध्यमातून होते. यातून रोज सुमारे १५ हजार रुपये मिळतात. १५०० रुपये प्रतीगाडी भाडेपट्टी व उर्वरित नफा विक्रीसाठी येणाऱ्या तीन शेतकऱ्यांमध्ये विभागला जातो. खरीप हंगाम तोंडावर असल्याने त्याकरिता लागणाऱ्या पैशाची सोय करण्यासाठी थेट भाजीपाला विक्रीचा पर्याय आमच्यासाठी पूरक ठरला, असे कमलेश भोयर यांनी सांगितले.
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...