Farming Agricultural News Marathi farmers facing urea shortage Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जुलै 2020

सध्या युरियाची टंचाई आहे. काही कृषी सेवा केंद्रांकडे युरिया आहे. मात्र किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेऊन पक्की बिलेही दिली जात नाहीत.                                                - अनिल गायकवाड, इंदोली, जि. सातारा. 

सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक खतांचे नियोजन केल्याचे कृषी विभाग सांगत असला तरी जिल्ह्यात सध्या युरियाची टंचाई जाणवू लागली आहे. ऊस, आले, हळद या नगदी पिकांसह खरिपातील पिकांना सध्या गरज असताना युरिया मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

सातारा जिल्ह्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा खत पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र इतर खतांच्या तुलनेत युरिया अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात जून अखेर ३१ हजार ५०० मेट्रिक टन युरियाची मागणी करण्यात आली होती. तसेच रब्बी हंगामातील युरिया शिल्लक होता.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनूसार आतापर्यंत ३४ हजार मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून सहा हजार ९६० मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. इतका युरिया शिल्लक असला तरी शेतकऱ्यांना हा युरिया मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा अर्थ असा होतो की कृषी सेवा केंद्रांकडून युरिया असून दिला जात नसल्याने टंचाई जाणवत आहे. काही कृषी सेवा केंद्रांबाबत युरिया असून दिला जात नसल्याच्या तक्रारी होत आहे.

काही कृषी सेवा केंद्रांकडून टंचाई भासवून जास्त दर आकारणीही केला जात आहे. वाढीव दरात युरिया विक्री केल्याने केंद्र चालकांकडून पक्क्या पावत्याही दिल्या जात नाहीत. यामुळे वाढीव दराचा कसलाही पुरावा शिल्लक राहत नाही. सोयाबीनच्या बियाणे उगवले नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा लागवड केली आहे. या संकटातून बाहेर पडत असतानाच आता युरियाची टंचाई जाणवू लागल्याने समस्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे. 

दोन दिवसांत चार हजार टन युरियाचा पुरवठा 
जिल्ह्यात युरियाची मागणी वाढल्यामुळे सध्या टंचाई जाणवत आहे. ही टंचाई दुर करण्यासाठी जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत चार हजार टन युरियाचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...