Farming Agricultural News Marathi farmers get saat bara certificate at door step Buldhana Maharashtra | Agrowon

मोताळा येथील शेतकऱ्यांना मिळतोय घरपोच सातबारा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

अकोला   ः सध्या पीककर्ज काढण्यासाठी सात-बारा उतारा व इतर कागदपत्रांची शेतकऱ्यांना आवश्‍यकता आहे. दुसरीकडे लॉकडाउन सुरु असल्याने ही कागदपत्रे मिळवताना, अधिकाऱ्यांच्या भेटी घेताना अनेक ठिकाणी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच सात-बारा उतारा देण्याचा निर्णय घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. या निर्णयाचे तहसीलदारांसह प्रशासनाकडूनही कौतुक केले जात आहे. 

अकोला   ः सध्या पीककर्ज काढण्यासाठी सात-बारा उतारा व इतर कागदपत्रांची शेतकऱ्यांना आवश्‍यकता आहे. दुसरीकडे लॉकडाउन सुरु असल्याने ही कागदपत्रे मिळवताना, अधिकाऱ्यांच्या भेटी घेताना अनेक ठिकाणी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत मोताळा (जि. बुलडाणा) तालुक्यातील तलाठ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच सात-बारा उतारा देण्याचा निर्णय घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. या निर्णयाचे तहसीलदारांसह प्रशासनाकडूनही कौतुक केले जात आहे. 

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. हंगामासाठी पीककर्ज गरजेचे असल्याने शेतकरी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. यात प्रामुख्याने सातबारा, नमुना आठ अ ही कागदपत्रे तलाठ्यांकडून घ्यावी लागतात. लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर, गावाबाहेर पडणे अडचणीचे झालेले आहे. त्यातच शेतीची कामे सुरु झाली आहेत. अशा परिस्थितीत ही कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्याला जाणे, तलाठी यांच्या भेटी घेणे जुळून येत नाही. तसेच गर्दी टाळून सोशल डिस्टन्स पाळणेही गरजेचे आहे. शेकऱ्यांची ही अडचण लक्षात घेत मोताळा तालुक्यातील तलाठ्यांनी सकारात्मक पाऊल उचलत थेट घरपोच सात-बारा उतारा देण्याचा निर्णय घेतला.

सोमवारपासून (ता.४) याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी तलाठ्यांना मेसेज करून किंवा फोनवर संपर्क साधत आपल्या शेताचा गटनंबर, कोणाच्या नावे सातबारा हवा आणि इतर कुठली कागदपत्रे हवी आहेत हे सांगितले की त्यांना कागदपत्रे घरपोच पोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या विभागात अशा प्रकारचा हा पहिला उपक्रम असल्याचे सांगितले जात आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...