अकोल्यात शेतकरी उत्पादक गटांकडून घरपोच भाजीपाला विक्री

दोन दिवसांपासून सुरु केलेल्या या उपक्रमास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी १३ ग्राहकांना अशी भाजीपाला बास्केट घरपोच देण्यात आली. दुसऱ्या दिवशीही ग्राहकांच्या मागण्यांनुसार भाजीपाला, फळे घरपोच देण्यात येत आहे. -योगेश नागापुरे, सदस्य, शेतकरी उत्पादक गट, डोंगरगाव.
ग्राहकांना पीक अप पॉईंटवरून भाजीपाल्याची डिलिव्हरी केली जात आहे.
ग्राहकांना पीक अप पॉईंटवरून भाजीपाल्याची डिलिव्हरी केली जात आहे.

अकोला  ः कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत (आत्मा) शेतकऱ्यांनी एकत्र येत ग्राहकांना घरपोच भाजीपाला विक्री सुरु केली आहे. अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथील जय गजानन शेतकरी उत्पादक गट, मासा येथील जय बजरंग शेतकरी स्वयं सहाय्यता गटाने सभासदांच्या शेतातील माल ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी साखळी तयार केली आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि निरोगी फळे तसेच भाजीपाला मिळावा यासाठी मोबाईलद्वारे किंवा व्हॉटसॲपव्दारे मागणी नोंदवण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांना जवळच्या पिकअप पॉईंटसवर हा शेतमाल उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी फळे, भाजीपाल्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा व घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांनी केले आहे.

ग्राहकांना भाजीपाला, फळांसाठी मोबाईलवर किंवा व्हॉटसॲपवर मागणी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर शेतकरी गटांकडून एका आठवड्याचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच दिले जात आहे. किमान मानवी संपर्क व्हावा आणि सुरक्षिततेसाठी शेतकरी गटांकडून खास व्यवस्था केली गेली आहे. यासाठी नागरिकांनी योगेश नागपुरे (मो.९८२२९९८४१२), योगेश बोळे ( मो.९५५२०३६५५२ ), प्रफुल्ल फाले (मो. ८०८०१०६२७९) यांच्याशी संपर्क साधावा. या सेवेत घरपोच माल दिल्यावरच निवडलेल्या पर्यायाप्रमाणे किंमत अदा करावयाची आहे, असेही सांगण्यात आले आहे.

या अभूतपूर्व संकटात जय गजानन उत्पादक शेतकरी गटाने प्रशासनाला सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशाच प्रकारे शासन, प्रशासन व नागरकांनी एकत्रितपणे एकमेकांना आधार देवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे. ग्राहक आणि शेतकरी या उपक्रमास चांगला प्रतिसाद देत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com