आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, वाणांविषयी माहितीचा खजिना
सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी प्रदर्शनास औरंगाबाद येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विविध भागांतील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन खूपच छान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कृषिपूरक उद्योगांसाठी आवश्यक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाची मॉडेल्स, विविध वाणांविषयी येथे सर्वांगीण माहिती मिळाली, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शेतकरी प्रतिक्रिया...
सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी प्रदर्शनास औरंगाबाद येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विविध भागांतील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. हे प्रदर्शन खूपच छान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. कृषिपूरक उद्योगांसाठी आवश्यक तंत्रज्ञान, यांत्रिकीकरणाची मॉडेल्स, विविध वाणांविषयी येथे सर्वांगीण माहिती मिळाली, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.
शेतकरी प्रतिक्रिया...
यांत्रिकीकरणाची मॉडेल्स उपयुक्त
मी एम.एस्सी.चा विद्यार्थी आहे. माझ्याकडे शेती नाही. परंतु, मला शेतीची आवड असल्याने प्रदर्शन पाहायला आलो. खूपच छान वाटले. विशेषतः यांत्रिकीकरणाची काही मॅाडेल्स कमालीची उपयुक्त आहेत. फवारणीपंपासह पूरक उद्योगातील अवजारांची माहिती मिळाली आणि यंत्रे पाहता आली. - शुभम भुसावळे, औरंगाबाद
कीटकनाशके वापराचे तंत्रज्ञान पाहता आले
बागायती पिकातील खते आणि कीटकनाशके वापरातील नवीन तंत्रज्ञान, काही अवजारे खूपच महत्त्वाची आणि फायदेशीर आहेत, ती पाहता आली. सीताफळाची माहितीही चांगली मिळाली. आमच्या भागात त्याची गरज आहे.
- सुखलाल पुरे, धरमपूर, जि. औरंगाबाद
सीताफळे, ठिबकबाबत माहिती मिळाली
मला सीताफळ, पेररू फळबागेविषयीची माहिती हवी होती. प्रदर्शनात सीताफळाची माहिती मिळाली. काही खते-कीटकनाशके आणि ठिबक तंत्रज्ञानातील नवी माहितीही मिळाली. आमच्या भागात कृषी प्रदर्शन भरवून ‘अॅग्रोवन’ने आमची सोय केली.
- सौ. सविता पवार, गणोरी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद
ट्रॅक्टरचलित अवजारे उपयुक्त वाटली
प्रदर्शनात सीताफळाचे काही वाण पाहता आले. त्याशिवाय ट्रॅक्टर आणि अन्य ट्रॅक्टरचलित अवजारे खूपच चांगली आहेत. शिवाय, फवारणी यंत्रे आणि पूरक उद्योगाची यंत्रे उपयुक्त वाटली.
- दीपक मानमोडे, जवळानिमजी, ता. सेलू, जि. परभणी
प्रदर्शनाचे आयोजन अतिशय चांगले
दरवर्षी ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी येत असतो. शेती तसेच पूरक व्यवसायाची माहिती मिळते, त्यामुळे शेतीमध्ये परिवर्तन केले. पेरू लागवड केली आहे. यंदा अतिशय चांगले आयोजन करण्यात आले आहे. यांत्रिकीकरणाबद्दल भरपूर माहिती मिळाली. महिला बचत गटामार्फत हळद पावडरनिर्मिती उद्योग सुरू करणार आहोत.
- दीपक पांढरे, जामखेड, ता. अंबड, जि. जालना
बियाणे, अवजारांबाबत माहिती मिळाली
गावाकडे सोळा एकर शेती आहे. कपाशी, ज्वारीचे उत्पादन घेत आहोत. यंदा प्रथमच कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलो आहोत. कपाशीच्या विविध वाणांच्या बियाण्यांची, तसेच कृषी अवजारांची माहिती मिळाली.
- सचिन जोशी, शेंदुरवादा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद
कृषी प्रदर्शन खूपच छान
आम्हाला सेंद्रिय शेतीची माहिती हवी होती. काही स्टॅाल्सवर ती मिळाली. सकाळ - ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन खूपच छान आहे. काही यंत्रे आणि शेती अवजारे पाहता आली. तसेच, सेंद्रिय उत्पादनांची वेगळी माहिती घेता आली. ही उत्पादने सहजपणे तयार करता येऊ शकतील, अशी आहेत.
- भगवानराव गुट्टे, अहमदपूर, जि. लातूर
विविध प्रकारच्या डाळ मिल पाहता आल्या
आमची दहा एकर शेती आहे. ऊस, मोसंबी, कपाशीचे उत्पादन घेत असतो. आमच्या गावात डाळ मिल नाही, त्यामुळे डाळ मिल सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती घेण्यासाठी मुद्दाम ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे. विविध प्रकारच्या डाळ मिल पाहावयास मिळाल्या.
- निवृत्ती बोंबले, पाचेगाव, जि. औरंगाबाद.
- 1 of 5
- ››