Farming Agricultural News Marathi farmers waiting for crop loan Sangli Maharashtra | Agrowon

आटपाडी तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या प्रतिक्षेत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 एप्रिल 2020

सध्या मार्चअखेर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांनाही नियम आणि अटींच्या आधीन राहून कर्ज वाटप केले जाईल.
- मनोहर साळुंखे, आटपाडी तालुका प्रमुख ,सांगली जिल्हा बॅंक.

आटपाडी, जि. सांगली  ः आटपाडी तालुक्‍यातील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्हा आणि राष्ट्रीयिकृत बॅंकेतील ४०७१ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले होते. त्यांचे कर्ज कर्ज खात्याला जमा करून त्यांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयिकृत बॅंकांनी खरीप हंगामासाठी अद्याप कर्ज पुरवठा केलेला नाही. कर्जमाफीतील पात्र शेतकरी नवीन कर्जाच्या प्रतिक्षेत आहेत.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी अटी घालून महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती जाहीर केली. या योजनेसाठी तालुक्‍यातील ४६०० प्रकरणे दाखल होती. त्यातील ४२५१ प्रकरणांचे प्रमाणिकरण झाले होते. विविध अटी आणि शर्तींची पडताळणी करून ४०७१ शेतकऱ्यांना २७ कोटी ११ लाखांची कर्जमाफी मिळाली. दरम्यान, पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील ३२०० शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर एकोणीस कोटींवर रक्कम जमा झाली आहे. राष्ट्रीयिकृत बॅंकेशी संबंधित ५२६ शेतकऱ्यांना चार कोटी ११ लाख रुपये मिळाले आहेत. तालुक्‍यातील ३७०० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर २४ कोटीं दरम्यान रक्कम जमा झाली आहे. राज्य सरकारने कर्जमाफी देताना संबंधित शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी नव्याने पीककर्ज द्यावे, असे स्पष्ट आदेश दिलेत प्रत्यक्षात बॅंकांनी याची अंमलबजावणी केलेली नाही.

सोसायट्यांकडून अंमलबजावणी नाहीच
जिल्हा बॅंकेने २७ मार्चला कर्जमाफीतील शेतकऱ्यांना नवीन कर्ज वाटपाचे बॅंका आणि सेवा सोसायटयांना लेखी आदेश दिले. संबंधित शेतकऱ्यांचे पीक पाणी पाहून १०० टक्के पीक कर्ज, अल्प आणि मध्यम मुदत आणि कंझम्शन कर्ज वाटप करावे. संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील इतर थकबाकीदार नसावे तसेच ज्या शेतकऱ्यांचा इकरार कमी असल्यास पीक पाहून तो दुप्पट करून वाढीव कर्ज द्यावे असे स्पष्ट आदेश दिले आहेत मात्र सोसायटयांनी याची अंमलबजावणी केलेली नाही.
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...