टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन् ड्रोनची प्रतीक्षाच

नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून फवारणी करून टोळधाडीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता आले आहे. परंतु अग्निशमन बंब पोचण्यासाठी रस्ता नसलेल्या भागात मात्र ट्रॅक्‍टरचलित ब्लोअरचा वापर करून किडीवर नियंत्रण मिळवले जात आहे. यातून अपेक्षित परिणाम दिसत नसल्यामुळे फवारणीसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली असली तरी त्याची प्रतीक्षा कायम आहे.
जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या झुंडीवर अग्निशमन यंत्राव्दारे कीडनाशकाची फवारणी केली जात आहे.
जंगल परिसरात वास्तव्यास असलेल्या झुंडीवर अग्निशमन यंत्राव्दारे कीडनाशकाची फवारणी केली जात आहे.

नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून फवारणी करून टोळधाडीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता आले आहे. परंतु अग्निशमन बंब पोचण्यासाठी रस्ता नसलेल्या भागात मात्र ट्रॅक्‍टरचलित ब्लोअरचा वापर करून किडीवर नियंत्रण मिळवले जात आहे. यातून अपेक्षित परिणाम दिसत नसल्यामुळे फवारणीसाठी हेलिकॉप्टर, ड्रोन उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली असली तरी त्याची प्रतीक्षा कायम आहे.

राजस्थान, पंजाब त्यानंतर मध्यप्रदेशातून विदर्भात दाखल झालेल्या टोळधाडीने आठवडाभरापासून अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. संत्रा, मोसंबीची नवती तसेच शेतात उभ्या असलेल्या भाजीपाला पिकाचा फडशा या किडीने पाडला. परिणामी नुकसानग्रस्त भागाच्या सर्व्हेक्षणाची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या दुर्गम मेळघाटातील आदिवासी गावांमध्ये सातपुडा ओलांडून ही कीड दाखल झाली. या भागात भाजीपाला क्षेत्र अधिक आहे.

त्याचे नुकसान केल्यानंतर मोर्शी, वरुडमधील संत्रा बागांना या किडीने लक्ष्य केले. चार दिवसांपेक्षा अधिक काळ वरुड, मोर्शी भागात ही कीड होती. त्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या आष्टी तालुक्‍यात दाखल झालेल्या या किडीने तेथेही नुकसान केले. गेल्या चार दिवसांपासून ही कीड नागपूर जिल्ह्याच्या विविध तालुक्‍यांत धुडगूस घालत आहे. पहिल्या टप्प्यात या किडीने काटोल, सावनेर या भागातील पिके फस्त केली. सोमवारी (ता.१) टोळधाड नागपूर लगतच्या हिंगणा तालुक्‍यातील जंगल परिसरात वास्तव्यास होती. तेथून या किडीला हुसकावण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

कळमेश्‍वर भागातही या किडीची एक झुंड असून या तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये ही कीड विखुरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. काटोल तालुक्‍यातून या किडीची झुंड बाहेर पडली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात १०० ते १५० इतक्‍या संख्येत ही कीड शिल्लक राहिली. या किडींकडून संत्र्याची नवती खाल्ली जात असल्याने प्रकाश संश्‍लेषण क्रियेवर परिणाम होतो; त्याचा थेट झाडाच्या अन्नशोषणाच्या क्रियेवर परिणाम होतो. फळांची गुणवत्ता यामुळे खालावते तसेच उत्पादनही घटते, अशी माहिती महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ यांनी दिली. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, या मागणीचा पुर्नउच्चार त्यांनी केला.   ड्रोनच्या उपलब्धतेबाबत नुसती चर्चा कृषिमंत्री दादा भुसे यांनी टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनचा वापर करणार असल्याचे सांगितले होते. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांना त्यांनी ड्रोन उपलब्धतेचे निर्देशही दिले. परंतु याकरिता लागणाऱ्या विविध परवानग्या तसेच ड्रोनची उपलब्धता, फवारणीसाठीचे दर व इतर तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने हे काम रखडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर घेतले होते. परंतु त्यानंतर या संदर्भाने कोणतेच काम झाले नसल्याने कृषी विद्यापीठाकडे सुध्दा ड्रोनव्दारे फवारणी विषयक काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com