Farming Agricultural News Marathi first commercial silage project start pune maharashtra | Agrowon

काटेवाडीत होणार पहिला व्यावसायिक मुरघास प्रकल्प

टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुणे  ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) नॅशनल डेअरी प्लॅन एक अंतर्गत देशातील पहिला व्यावसायिक मुरघास पायलट प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दूध संस्थेसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. हा प्रकल्प संघामार्फत काटेवाडी (ता. बारामती) येथील शारदा सहकारी दूध उत्पादक संस्थेला देण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

पुणे  ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) नॅशनल डेअरी प्लॅन एक अंतर्गत देशातील पहिला व्यावसायिक मुरघास पायलट प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दूध संस्थेसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. हा प्रकल्प संघामार्फत काटेवाडी (ता. बारामती) येथील शारदा सहकारी दूध उत्पादक संस्थेला देण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

याबाबत श्री. जगताप म्हणाले, की एनडीडीबीने देशातील पहिला व्यावसायिक मुरघास पायलट प्रकल्प संघाला दिला आहे. त्यासाठी सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर तो देशभर राबविण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांकरिता चांगल्या प्रतिचा चारा योग्य मोबदल्यात मिळणार असून दूध उत्पादनात वाढ होणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी (ता. १३) संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली, काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. या वेळी छत्रपती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, शारदा सहकारी दूध संस्थांचे अध्यक्ष महादेव कचरे, ज्येष्ठ संचालक प्रकाश तावरे, आप्पासाहेब शेळके, तानाजी खोमने, संघाचे वित्त व लेखा विभागाचे उप महाव्यवस्थापक राजेंद्र शिर्के, पशुखाद्य विभागाचे व्यवस्थापक कैलास भुजबळ, डेअरी व्यवस्थापक संदीप भापकर आदि उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...