संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
बातम्या
काटेवाडीत होणार पहिला व्यावसायिक मुरघास प्रकल्प
पुणे ः दुष्काळी स्थितीत जनांवरासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (एनडीडीबी) नॅशनल डेअरी प्लॅन एक अंतर्गत देशातील पहिला व्यावसायिक मुरघास पायलट प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दूध संस्थेसाठी शंभर टक्के अनुदान दिले जाणार आहे. हा प्रकल्प संघामार्फत काटेवाडी (ता. बारामती) येथील शारदा सहकारी दूध उत्पादक संस्थेला देण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

याबाबत श्री. जगताप म्हणाले, की एनडीडीबीने देशातील पहिला व्यावसायिक मुरघास पायलट प्रकल्प संघाला दिला आहे. त्यासाठी सुमारे १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर तो देशभर राबविण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांकरिता चांगल्या प्रतिचा चारा योग्य मोबदल्यात मिळणार असून दूध उत्पादनात वाढ होणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी (ता. १३) संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली, काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. या वेळी छत्रपती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र रायकर, शारदा सहकारी दूध संस्थांचे अध्यक्ष महादेव कचरे, ज्येष्ठ संचालक प्रकाश तावरे, आप्पासाहेब शेळके, तानाजी खोमने, संघाचे वित्त व लेखा विभागाचे उप महाव्यवस्थापक राजेंद्र शिर्के, पशुखाद्य विभागाचे व्यवस्थापक कैलास भुजबळ, डेअरी व्यवस्थापक संदीप भापकर आदि उपस्थित होते.
- 1 of 1504
- ››