Farming Agricultural News Marathi google link become useful in between farmers and agriculture department Nagpur Maharashtra | Agrowon

नागपूरमध्ये शेतकरी आणि कृषी विभागात गुगल लिंक ठरतेय दुवा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 एप्रिल 2020

गुगल लिंकचा पर्याय शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करुन दिला आहे. त्या माध्यमातून १७६९ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण तर १३६४ शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी उत्साही असल्याचे कळविले आहे. लॉकडाउन संपल्यानंतर या शेतकऱ्यांकडून ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. लॉकडाऊन वाढल्यास मात्र त्यांचे हेच प्रस्ताव ग्राह्य धरुन त्यांना योजनांचा लाभ देता येईल का ? याचा विचार केला जाणार आहे.
- मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर.

नागपूर   ः ‘कोरोना’च्या पार्श्नभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात शेतीविषयक कामांवर परिणाम होऊ नये याकरिता कृषी विभागाकडून गुगल लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामाध्यमातून आजवर सुमारे २६०० शेतकऱ्यांनी गुगल लिंकवर फळबाग लागवडीसह यांत्रिकीकरणाकरिता उत्साही असल्याचे कळविले आहे. लॉकडाउन संपताच या शेतकऱ्यांशी संपर्क साधत पुढील प्रक्रिया पूर्ण करुन घेत त्यांना योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना हंगामात मिळणाऱ्या योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. फळबाग त्यासोबतच यांत्रिकीकरणाच्या योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. ही अडचण लक्षात घेत नागपूर जिल्हा कृषी विभागाने गुगल लिंकच्या माध्यमातून प्रस्तावाची प्रक्रिया सुरु केली आहे. २६०० शेतकऱ्यांचा याला प्रतिसाद मिळाला असून त्याची वर्गवारी करीत योजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...