Farming Agricultural News Marathi government will give fund for raisin production Nashik Maharashtra | Agrowon

बेदाणा निर्मितीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देणाार ः माणिकराव कोकाटे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 एप्रिल 2020

नाशिक: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाल्याने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. द्राक्षे बागेतच पडून आहे. अशा परिस्थितीत उत्पादकांनी झाडावरच डिपिंग ऑइलचा स्प्रे करून स्वतः बेदाणानिर्मिती करावी. बेदाणा निर्मिती शेतकऱ्यांना नुकसानीपोटी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देणार असल्याची माहिती सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.

नाशिक: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाल्याने द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. द्राक्षे बागेतच पडून आहे. अशा परिस्थितीत उत्पादकांनी झाडावरच डिपिंग ऑइलचा स्प्रे करून स्वतः बेदाणानिर्मिती करावी. बेदाणा निर्मिती शेतकऱ्यांना नुकसानीपोटी प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देणार असल्याची माहिती सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.

जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात ३० टक्के तयार माल काढणीविना बाकी आहे. त्यामुळे माल झाडावरच खराब होत असल्याची स्थिती आहे. सध्या द्राक्षे शीतगृहात ठेवूनही पुढे मागणी व व्यापाऱ्यांकडून पैशाची शाश्वती नसल्याने शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष पिक अडचणीत आहेच; नोटाबंदीपासून अडचणींमध्ये वाढ झाली आहे. याच द्राक्ष पिकाने नाशिकला जगभर ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे सरकार यासाठी २०० ते ३०० कोटी रुपये खर्च करू शकत नाही का? तर होय, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे, असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असताना दर, शीतगृह उपलब्धता, व्यापारी, मजूर व वाहतुक व्यवस्था याबाबत अडचणी आहेत. द्राक्ष पीक हे इतर पिकांच्या तुलनेत खर्चिक असल्याने उत्पादकांनी घाबरून न जाता योग्य वेळेत प्रक्रिया करून बेदाणा निर्मिती करावी. जे शेतकरी बेदाणे निर्मिती करतील त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळवून देऊ. त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे श्री.कोकाटे यांनी सांगितले.

कृषी सहाय्यक व संबंधित अधिकाऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी देखील कृषी सहाय्यकांना संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. काही द्राक्ष उत्पादकांना डिपिंग ऑइल उपलब्ध होत नसेल तर ते मी उपलब्ध करून देईल. कोणत्याही शेतकऱ्याला काहीही अडचण असल्यास त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कोकाटे यांनी केले आहे.

द्राक्ष उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी तत्वतः मंजुरी
बेदाणा निर्मिती करणाऱ्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानापोटी प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रह करण्यात आला आहे. यास श्री. पवार यांनी तत्वतः मान्यता दिल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...