Farming Agricultural News Marathi horticulture plantation status Ratnagiri Maharashtra | Agrowon

रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्टरवर फळबाग लागवड

टीम अॅग्रोवन
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६७५८ हेक्टरवर आंबा, काजू ,नारळ, सुपारी या नगदी पिकांची लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिल़ी.

रत्नागिरी  ः राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ६७५८ हेक्टरवर आंबा, काजू ,नारळ, सुपारी या नगदी पिकांची लागवड केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी दिल़ी. यामध्ये सर्वाधिक २४४६ हेक्टरवर काजूची लागवड करण्यात आली आह़े. यंदा चाकरमानी दाखल झाल्यामुळे या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ‘मग्रारोहयो’च्या माध्यमातून विविध कामांची पूर्तता करताना फळबाग लागवडीला प्राधान्य देण्यात आले आह़े. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने फळबाग लागवड योजनेमध्ये सर्वाधिक लक्ष गाठले आहे. यामध्ये काजू बरोबरच १९३८ हेक्टरवर आंबा, १५४६ हेक्टरवर नारळ तर १०२८ हेक्टर क्षेत्रावर सुपारीची लागवड करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अडीच कोटी ९३ लाखांचा निधी मजुरांवर खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यातील वातावरण फळबाग लागवडीसाठी अनुकूल असल्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले. अल्प भूधारकांसह पाच हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी देखील योजनेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले.  

निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा, काजू, नारळ आदी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नव्याने फळबाग लागवडीसाठी सद्यःस्थितीत शेतकरी प्राधान्य देत आहेत. कृषी विभागाच्या ‘मग्रारोहयो’च्या माध्यमातून होत असलेली फळबाग लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

जिल्ह्यातील फळबाग लागवड क्षेत्र (हेक्टर) : काजू -२४४६, आंबा - १९३८, नारळ -    १५४६,सुपारी - १०२८.
 


इतर बातम्या
सिंधुदुर्गात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन...
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे :  राज्यातील बहुतांशी भागात पुन्हा...
कोल्हापूर बाजार समिती संचालकांचे...कोल्हापूर : बेकायदेशीर नोकर भरती तसेच जागा...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
मोर मध्यम प्रकल्पाच्या कालवा...हिंगोणा, जि. जळगाव ः सातपुडा पर्वतातील मोर...
मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत ५१...औरंगाबाद :  मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांतील...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
खेडे स्वयंपूर्ण, तर राज्य, देश...नाशिक : ‘‘कोविड- १९ च्या या परिस्थितीत...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील १७८...सोलापूर : ‘‘सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा...
प्रविण कसपटे ठरले सर्वाधिक बिझनेस...बार्शी : येथील युवा उद्योजक प्रविण कसपटे यांनी...