कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनची होणार स्थापना : आमदार रोहित पवार

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार

पुणे  ः मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्जत - जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना शनिवारी (ता.१५) पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते, तर अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

मंगळवारी (ता.११) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले, की फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास, पर्यटन, आरोग्य, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रांच्या विकासासाठी काम करण्यात येणार आहे. मतदारसंघातील पीकपद्धती बदलण्यासाठी ३० गावे जलसंधारणाकरिता दत्तक घेण्यात आली असून, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम सुरू आहे. या प्रकारच्या विविध विकासकामांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघ पुढील पाच वर्षांत नगर जिल्ह्यात क्रमांक एक वर तर राज्यात क्रमांक पाच वर असण्याचा प्रयत्न असणार आहे. 

दिल्ली निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना श्री. पवार म्हणाले, की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि विविध शासकीय योजनांची सहजसुलभ पद्धतीने केलेल्या अंमलबजावणीच्या कामाला मतदारांनी स्वीकारत, भाजपाचा पैसा, १२ राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील २५० आमदार, खासदार यांच्या प्रचाराला नाकारले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com