farming agricultural news marathi karpa on onion crop pune maharashtra | Agrowon

प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात कांदा पिकावर करपा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मी दरवर्षी कांद्याची पाच ते सहा एकरांवर लागवड करतो. यंदा तीन ते चार एकरांवर कांद्याची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे कांदा पिकावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आर्थिक खर्चातही वाढ झाली आहे.
- भाऊसाहेब पळसकर,  कर्डे, ता. शिरूर, जि. पुणे.

पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा लागवडीवर भर देत आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव २० ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.    

जिल्ह्यात आत्तापर्यंत २५ हजार ४९० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. अजूनही अनेक ठिकाणी रब्बी कांदा लागवड सुरू आहे. उशिरा खरिपात लागवड झालेले कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. नवीन लावलेला कांदा मॉन्सूनोत्तर पावसामुळे खराब झाला आहे. त्यातच अधूनमधून ढगाळ हवामान होत असून कांदा पातीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली या भागात हा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. तसेच पिकाच्या गाभ्याचेही नुकसान होत आहे.

करप्याच्या प्रादुर्भावामुळे कांद्याची वाढ खुंटली आहे. पात पिवळी पडली आहेत. कांद्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून फवारणीचा खर्च वाढत आहे. कृषी विभागाकडून उपाय योजनांबाबत गाव पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, करप्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.  

गेल्या काही दिवसांपासून असलेल्या प्रतिकूल हवामानामुळे कांदा, बटाटा पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सकाळी पडणारे धुके, दव आदी कारणांमुळे हा प्रादुर्भाव होत असून, शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन फवारण्या कराव्यात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
 बी. जे. पलघडमल यांनी सांगितले.

 


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...