Farming Agricultural News Marathi Mahanand will purchase extra milk Nagar Maharashtra | Agrowon

राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंद खरेदी करणार ः रणजितसिंह देशमुख

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगासह देश आणि राज्यात झाला आहे. याचा मोठा परिणाम दूध व्यवसायावर होत असून राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री थांबली आहे. परिणामी अनेक सहकारी दूध संघांना एक दिवस दूध पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका दूध उत्पादकांना बसत असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात उत्पादित होणारे अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंद खरेदी करणार असल्याची माहिती महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगासह देश आणि राज्यात झाला आहे. याचा मोठा परिणाम दूध व्यवसायावर होत असून राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री थांबली आहे. परिणामी अनेक सहकारी दूध संघांना एक दिवस दूध पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. याचा फटका दूध उत्पादकांना बसत असून त्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात उत्पादित होणारे अतिरिक्त १० लाख लिटर दूध महानंद खरेदी करणार असल्याची माहिती महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.

याबाबत श्री. देशमुख म्हणाले, की देशव्यापी लॉकडाऊनमुळे दुधाची विक्री थाबंली आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा सहकारी दुध संघ व तालुका सहकारी दुध संघांकडेही अतिरिक्त दुध शिल्लक राहत आहे. याप्रश्नी मार्ग काढण्यासाठी दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघास (महानंद) यावर मार्ग काढण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितला. दुध महासंघानेही तातडीने प्रस्ताव दुग्धविकास खात्यास सादर केला.त्यावर दुग्धविकास खात्याने दिलेल्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता देऊन २०० कोटी रुपये मंजूर केले. याकामी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनीही पाठपुरावा केला.

या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघामार्फत जिल्हा दूध संघ व तालुका सहकारी दुध संघांचे अतिरिक्त दूध हे शासन दराप्रमाणे २५ रुपयांप्रमाणे संकलित करण्याचे निश्चित केले आहे. या दूधाची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ दूध भुकटी करणार आहे. तसेच सहकारी दुध संघ व खाजगी दुध संघाच्या भुकटी प्रकल्पांबरोबर करार करून दूध पावडर तयार करून घेण्यात येणार आहे. ही योजना येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होईल.


इतर ताज्या घडामोडी
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...
राज्यात टोमॅटो ५०० ते २५०० रूपये...सांगलीत १ हजार ते १२५० रूपये दर सांगली  ः...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...