पीकविमाप्रश्नी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार ः जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पीकविमाप्रश्नी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करताना शेतकरी
पीकविमाप्रश्नी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करताना शेतकरी

अमरावती  ः विम्याचा लाभ मिळू नये, याकरिता पर्जन्यमापक यंत्रच बंद करण्यात आल्याचा प्रकार शिरगाव कसबा येथे घडला होता. याबाबत सोमवारी (ता.३) तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांशी फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दुपारी बैठकही पार पडली. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

१ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ३० मिमी पाऊस झाला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी १९ हजार २५० रुपयांचा विमालाभ मिळणार होता. त्याकरिता सर्कलमधील पावसाची नोंद ग्राह्य धरली जाणार होती. अमरावती जिल्हा प्रशासनाने यासंदर्भाने जागृती केली. परिणामी, शिरजगाव कसबा येथील १३५० शेतकऱ्यांनी १५४३ हेक्‍टरवरील संत्राक्षेत्र संरक्षित केले. जिल्ह्यात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पाऊस झाला; परंतु शिरजगाव कसबा येथे बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीतील नोंदीच घेण्यात आलेल्या नाहीत. त्याआधीच्या व नंतरच्या नोंदी मात्र यात आहेत.

त्यामुळे संशयाला वाव असल्याने शेतकऱ्यांनी या प्रकरणात पर्जन्यमापक यंत्रणेची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या ‘महावेध’शी संपर्क साधला. त्यांनी सयंत्राची पाहणी केली आणि त्याचा अहवाल प्रलंबित आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आली; परंतु या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही. 

‘ॲग्रोवन’ने सोमवारी (ता.३) यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कमलेश रोहटे, नितीन आवारे, संजय गुर्जर, पंकज ढोले, विवेक लांडे, महेंद्र ठाकरे, वीरेंद्र आजनकर, वैभव गणोरकर, गणेश आकोटकर, रोहित पोकळे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com