नगर, पारनेरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

नगर ः नगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा पारनेर, नगर तालुक्यात मुगाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः नगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा पारनेर, नगर तालुक्यात मुगाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३१ हजार हेक्टरने सरासरी क्षेत्र वाढून ते ४० हजार ३७८ हेक्टर करण्यात आले आहे. आतापर्यत सरासरीच्या तुलनेत अधिक म्हणजेच ४४ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी ३२ हजार १३१ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. जिल्ह्यात पारनेर व नगर तालुक्यात खरिपात मुगाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असते. मात्र पावसाळ्याच्या सुरवातीला पाऊस कसा होतो त्यावर मुगाचे क्षेत्र कमी जास्त होते.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी सरासरी क्षेत्र ९ हजार २५८ हेक्टर होते. मात्र ३२ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या ३४७ टक्के पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा २८ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यंदा निसर्ग चक्रीवादळापासून सुरु झालेला पाऊस कायम राहिला. रोहिणी, मृगातही चांगला पाऊस झाला. मुगाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पारनेर, नगर तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पाऊस आहे. त्यामुळे मुगाच्या क्षेत्रात यंदा बऱ्यापैकी वाढ होणार आहे. यंदा आतापर्यंत ४४ हजार ३१८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी पेक्षा अधिक पेरणी झाली आहे. अजून सुमारे सात ते दहा हजार हेक्टरने क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मुगाची पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टर) ः नगर १५,९४९, पारनेर १६,४२८, श्रीगोंदा ३८४, कर्जत ३३२२, जामखेड १९७६, शेवगाव १०९४, पाथर्डी २९७७, नेवासा ९४५, राहुरी ६६४, संगमनेर १७५, अकोले १६, कोपरगाव २८२, श्रीरामपूर ९५, राहाता ३१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com