Farming Agricultural News Marathi new vegetable plantation become in trouble Kolhapur Maharashtra | Agrowon

भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम; रोपांच्या मागणीवर परिणाम

राजकुमार चौगुले
मंगळवार, 7 एप्रिल 2020

भाजीपाला रोपांच्या मागणीत सुमारे ५० टक्क्यांहून अधिक घट आहे. मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांमध्येही नव्या लागवडी करण्याबाबत संभ्रम आहे. यामुळे ‘आम्ही सांगू तेव्हा द्या’, अशीच विनंती शेतकऱ्यांकडून होत आहे. दुसरीकडे अपुरे मनुष्यबळ, बियाणे, कॉकपीट व अन्य निविष्टांच्या अनुपलब्धतेमुळे नवी रोपे करण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. 
— शिवाजीराव कचरे,  रोपवाटिका चालक, तमदलगे, जि.कोल्हापूर.

कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला उत्पादक मोठ्या तोट्यात गेल्याने नव्याने लागवडीबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील रोपवाटिकांकडे राज्यभरातून येणाऱ्या भाजीपाला रोपांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी नियोजित भाजीपाला लागवड रद्द करत असल्याने सध्याचे प्लॉट संपल्यानंतर भाजीपाल्याची मोठी चणचण भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. साधारणतः जूननंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावेल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे रोपवाटिकांमध्येही परिस्थिती बिकट बनली आहे. कामगार नसल्याने रोपांचे व्यवस्थापन करणे अशक्‍य बनले आहे. बियाणे, कोकोपीट उपलब्ध होत नसल्याने येत्या काही काळात रोपे तयार करणे अशक्‍य असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले. 

यासर्वांचा एकत्रित परिणाम नव्या लागवडींवर होणार आहे.  ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या शक्‍यतेने देशभर लॉकडाऊन सुरु आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा अनियमित आहेत. यातच मोठे हॉटेल, उपाहारगृहे बंद असल्याने घाऊक प्रमाणात जाणाऱ्या भाजीपाल्याला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पाच ते दहा एकरांपर्यंत भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. मजूर नाहीत, त्यातच मालाला उठाव व दर नाही. यामुळे ढोबळी मिरचीसारखा भाजीपाला शेतातच खराब होत आहे. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच बिकट बनली आहे.

लाखो रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे. यामुळे ‘पुढची लागवड राहू द्या, आता काय करायचे’, याच विचारात भाजीपाला उत्पादक आहे. सध्याच्या प्लॉटला भवितव्य नसल्याने पट्टीचे भाजीपाला उत्पादकही हादरले आहेत. विक्रीची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे पंधरा ते वीस वर्षांपासून सलग भाजीपाला घेणाऱ्या उत्पादकांनीही येत्या काही महिन्यांत नव्या लागवडीचा विचार बाजूला ठेवला आहे. शेतकऱ्यांची ही सार्वत्रिक भावना असल्याने भाजीपाला लागवडीची गती अत्यंत मंद राहील अशी शक्‍यता आहे.

मी अनेक वर्षांपासून ढोबळी मिरची करतो. चार ते पाच एकरांवर ढोबळीचे पीक प्रत्येक वर्षी असतेच. दर जरी कमी असला तरी मालाचा उठाव होत असल्याने प्रत्येक वर्षी कमी-जास्त प्रमाणात रक्कम हाती येते. ‘कोरोना’च्या दणक्‍याने यंदा मात्र मी हतबल झालोय. उपाहारगृहे, पंचतारांकित हॉटेल्स बंद असल्याने ढोबळी मिरचीला मागणी थांबली आहे. उत्पादन आताच सुरु झालेय. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती विक्रीही शक्‍य नाही. भाजीपाल्याचा दीर्घ अनुभव असूनही येत्या काही महिन्यांत भाजीपाला लागवडीचा मला पुनर्विचार करावा लागेल अशी चिन्हे असल्याचे उदगाव येथील संजय मादनाईक यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...