Farming Agricultural News Marathi now doorstep delivery of chicken in district Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात घरपोच मटण, चिकन विक्रीस प्रारंभ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 एप्रिल 2020

सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये इतर जिल्ह्यांत मटण, चिकन विक्रीला बंदी नसतानाही सातारा जिल्ह्यात मात्र बंदी होती. यामुळे शेळीपालक, कुक्कुटपालन शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मटण, चिकनच्या घरपोच विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या व्यावसायिकांनी घरपोच मटण, चिकन विक्री सुरू केली आहे.

सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये इतर जिल्ह्यांत मटण, चिकन विक्रीला बंदी नसतानाही सातारा जिल्ह्यात मात्र बंदी होती. यामुळे शेळीपालक, कुक्कुटपालन शेतकऱ्यांसह विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मटण, चिकनच्या घरपोच विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या व्यावसायिकांनी घरपोच मटण, चिकन विक्री सुरू केली आहे.

‘कोरोना’प्रसार रोखण्यासाठी २३ मार्चपासून राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता. हा निर्णय घेताना केंद्र शासनाने मटण व चिकनचा अत्यावश्‍यक गोष्टींच्या यादीमध्ये समावेश केला होता. तशीच भूमिका राज्य सरकारनेही घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती.

परंतु, सातारा जिल्ह्यात मटण व चिकन विक्रीला बंदी घालण्यात आली होती.या विक्री बंदीचा फटका शेळीपालक, कुक्कुट पालन शेतकऱ्यांसह विक्रेत्यांना बसला होता. बंदीच्या कालावधीत काही ठिकाणी मटण व चिकनची चोरून विक्री होत होती. त्यामुळे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले होते. तसेच चोरून विकणाऱ्या काही दुकानचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले विक्रेते,शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगार संकटात सापडले होते. विक्री बंद असल्याने अनेकांना कोंबड्यांना खाद्य देणेही परवडत नव्हते. त्यामुळे मोफत वाटप करावे लागले. याबाबत मटण विक्रेता संघटनेनेही निवेदन दिले. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच मटण व चिकनच्या घरपोच विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मटण व चिकन विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...