Farming Agricultural News Marathi Possibility of delay in works of irrigation projects Jalgaon Maharashtra | Agrowon

जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे रखडण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर नियोजित सिंचन प्रकल्पांसाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. पावसाळा व इतर कारणांमुळे वाघूर, शेळगाव प्रकल्पाचे काम बंद झाले आहे. ‘कोरोना’मुळे आर्थिक संकटही आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रखडतील, अशी स्थिती आहे. 

जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर नियोजित सिंचन प्रकल्पांसाठी कुठलाही निधी मंजूर झालेला नाही. पावसाळा व इतर कारणांमुळे वाघूर, शेळगाव प्रकल्पाचे काम बंद झाले आहे. ‘कोरोना’मुळे आर्थिक संकटही आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रखडतील, अशी स्थिती आहे. 

वाघूर प्रकल्पाचे काम वेगात सुरू होते. शेतांमध्ये बंदिस्त जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. जळगाव, भुसावळ आदी भागात हे काम हाती घेतले आहे. दोन वर्षे हे काम गतीने सुरू आहे. त्यासंबधी गावोगावी पाणी व्यवस्थापन समित्यांची स्थापनादेखील झाली आहे. हे काम गतीने सुरू असले तरी पावसाळ्यात शेतांमध्ये यंत्रणा राबविणे शक्य नाही. यामुळे हे काम बंद करावे लागले आहे. हे काम आता पुढील वर्षी रब्बी हंगामानंतर सुरू होईल, अशी स्थिती आहे.

तसेच केंद्र सरकारने जिल्ह्यात प्रायोगिक प्रकल्प म्हणून गिरणा नदीवर बलून बंधारे उभारण्याचे नियोजन केले आहे. सात बंधारे तयार होणार असून, त्यासंबंधी सर्व मान्यता मिळाल्या आहेत. परंतु प्रकल्पासाठी निधी मंजूर झालेला नाही. या प्रकल्पामुळे सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तसेच किमान १०० गावांमधील पाणीटंचाई दूर होणार आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, जळगाव तालुक्यांसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. कोरोनामुळे वित्तीय संकट असल्याने पुढेही हा प्रकल्प मार्गी लागणे कठीण आहे. यामुळे या प्रकल्पाबाबतची आशा मावळली आहे. 
 
प्रकल्प दुर्लक्षित; शेतकरी नाराज
केंद्र सरकारने मध्य प्रदेशातील खारिया गोटी येथे तापी नदीवर महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प राबविण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासंबंधीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा मंजूर झालेला नाही. त्यासंबंधीचे कामही आता रेंगाळले आहे. जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प दुर्लक्षित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या प्रकल्पांसाठी निधी मंजूर करून काम हाती घेतले पाहिजे. जिल्ह्यात एकही नवा प्रकल्प मागील अनेक वर्षांत पूर्ण झालेला नाही. शेळगाव प्रकल्पाचे काम गतीने सुरू होते. परंतु त्याचे काम आता पावसाळ्यामुळे बंद झाले आहे. २०२१ मध्ये हे काम पूर्ण करण्याचे दावे लोकप्रतिनिधींनी केले होते. परंतु किमान दोन वर्षात हा प्रकल्पदेखील पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...