नांदेड जिल्ह्यात हरभऱ्यालाच पसंती; एक लाख ४१ हजार हेक्टरवर पेरा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक पसंती दिल्यामुळे हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. १७) जिल्ह्यात हरभऱ्याची १ लाख ४१ हजार ३१५ हेक्टरवर म्हणजेच २२६.६५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी पिकांची मिळून एकूण १ लाख ९३ हजार ९३६ हेक्टरवर म्हणजेच १४१.२७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांतील रब्बी पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी हरभऱ्याचे क्षेत्र ७२.८६ टक्के असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

सप्टेंबर आणि ऑॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा सिंचन स्रोतांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी प्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी हरभऱ्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये रब्बीचे ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९७५, गव्हाचे ३८ हजार ५३८, मक्याचे ३ हजार १७६, हरभऱ्याचे ६२ हजार ३५९, करडईचे ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

बुधवारपर्यंत (ता. १७) जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांमध्ये मिळून एकूण १ लाख ९३ हजार ९३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरणी क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या जवळपास पोचले आहे. गव्हाची निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. करडईचे क्षेत्र ४० टक्क्यांच्या आतच आहे. नांदेड, अर्धापूर, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, कंधार, लोहा या १२ तालुक्यांतील रब्बीच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. मुदखेड, हिमायतनगर, नायगाव, मुखेड या ४ तालुक्यांत ३३.३३ ते ९४.७५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हिमायतनगर तालुक्यात पेरणीची टक्केवारी सर्वांत कमी आहे.  

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टर)
पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी २६,९७५ २५,२८७ ९३.७४
गहू ३८,५३८ २०,४६४ ५३.१०
मका ३१७८ २४९६ ७८.५४
हरभरा ६२,३४९ १,४१,३१५ २२६.६५
करडई ४७६८ १५३८ ३२.२५
सूर्यफूल ९४ ३४४ ३६५.९५
तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
नांदेड १८,५१२ २०,३१० १०१.७१
मुदखेड ५७२० ३२४१ ५६.६६
अर्धापूर ५५७२ १४,९९८ २६९.१७
हदगाव १३,६५६ १५,४०० ११२.७७
माहूर ३६३० ५२८० १४५.४५
किनवट ५३८४ १४,४७४ २६८.८३
हिमायतनगर १०,५६२ ३५२० ३३.३३
भोकर ५९३१ ६८६६ ११५.७६
उमरी ४२९३ ६९७५ १६२.४७
धर्माबाद ४७५२ ११,४१७ २४०.२६
नायगाव १२,४८५ ९३६७ ७५.०३
बिलोली १२,७५२ ३२,९५१ २५८.४०
देगलूर १०,१८८ १८,९५४ १८६.०४
मुखेड. १०,६८९ १०,१२८ ९४.७५
कंधार. ७४६५ ८४४१ ११३.०७
लोहा ५१२९ १०,८१४ २११.१७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com